“धुमशान घाला रे” हे मालवणी बोलीभाषेतले गीत प्रेक्षकांच्या भेटीला

एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला ‘प्रेमप्रथा धुमशान’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातलं धुमशान घाला रे हे धमाल मालवणी गाणं लाँच करण्यात आलं असून, 28 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजित वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजित वारंग (Abhijeet Warang) यांच्या ‘पिकासो’ (Picasso) या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला ‘देजावू’ हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते ‘प्रेमप्रथा धुमशान’ (Prempratha Dhumshan) हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘पिकासो’प्रमाणेच ‘प्रेमप्रथा धुमशान’ हा चित्रपटही मालवणी बोलीभाषेतलाच आहे.  महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, गीत संजय वारंग,   आनंद लुंकड यांचे संगीत दिग्दर्शन आणि विवेक नाईक यांच्या दमदार आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. 

मालवणी बोलीभाषेतील गाण्याची धूम 

“धुमशान घाला रे” हे मालवणी बोलीभाषेतलंच गाणं आहे. मालवणी बोलीभाषा ही अत्यंत धमाल आणि कानाला वेगळीच जाणवणारी भाषा आहे. यामध्ये मधाळपणा नसला तरीही ही भाषा कमालीची लोकांना आवडते. मालवणी भाषेतील शिव्यांमध्येही प्रेम दिसून येते. धमाल शब्द आणि ताल धरायला लावणारं संगीत या गाण्याला लाभलं आहे. मालवणी गाणी फारच मोजकी असल्यानं या नव्या धमाल गाण्याची आता त्यात भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका अत्यंत वेगळ्या प्रथेवर या चित्रपटातील कथा बेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच चर्चा आहे. मात्र आता धूमशान घाला रे हे गाणं मालवणी माणसांसह समस्त चित्रपटप्रेमींना ताल धरायला लावणारं आहे. शिवाली परब (Shivali Parab) एका वेगळ्याच अवतारात या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. 

शिवालीनं महाराष्ट्राची हास्यजत्रातून विनोदी भूमिकांमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. पण आता चित्रपटातून तिचा सकस अभिनयही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिवालीबरोबर विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, अक्षता कांबळी, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे कलाकार आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे.

तर आतापर्यंत मालवणी बोलीचा वापर चित्रपटात बहुतांशी विनोदनिर्मितीसाठी केला गेला. पूर्ण मालवणी बोलीतले चित्रपट अगदीच मोजके आहेत. मात्र मालवणी बोलीला, तिथल्या माणसांना आणि त्यांच्या गोष्टींना वेगळ्या उंचीवर घेऊन जात अभिजित वारंग यांनी ‘प्रेमप्रथा धुमशान’ चित्रपटातून अनोखी प्रेमकथा मांडली आहे. त्यामुळे आता वेगळं, आशयपूर्ण चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठी ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा.

शिवाली परब 28 ऑक्टोबरला करणार ‘प्रेम प्रथा धुमशान’

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटमची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन असणारा “मधुरव” आता रंगभूमीवर

अभिनेत्री संस्कृती बालगुडे झाली ‘बेभान’

Leave a Comment