जप 108 वेळाच का केला जातो, तुम्हाला याचं कारण माहीत आहे का

बरेचदा जप करताना तुम्ही निरीक्षण केले असेल तर जपाची माळ ही 108 मण्यांची असते. पण जप हा 108 वेळाच का केला जातो याबाबत तुमच्या मनात कधी प्रश्न निर्माण झाला आहे का? तसं असेल तर नक्की याचे कारण काय आहे हे जाणून घेतले आहे का तुम्ही? जर तुम्हाला माहीत नसेल तर याची नक्की सत्यता काय आहे हे जाणून घ्या. योग आणि ज्योतिषशास्त्रानुसार 108 हा क्रमांक खूपच शुभ मानला जातो आणि कोणतीही पूजा 108 वेळा मंत्रोच्चरणाशिवाय अपूर्ण मानली जाते. मंत्राचा जप हा वेदानुसार करण्यात येतो आणि याचा संबंध आपल्या संस्कृतीशी जोडण्यात आला आहे. असं म्हटलं जातं की, हे सर्व मंत्र संस्कृत भाषेतून निर्माण झाले आहेत.  

108 संख्येचा उगम 

सौजन्य – Freepik

वास्तविक सर्व भाषेचा उगम हा संस्कृत भाषा आहे आणि 108 हा क्रमांक अत्यंत शुभ मानला जातो. संस्कृत भाषेत एकूण 54 अक्षरे असतात आणि प्रत्येक अक्षराचे दोन भाग हे स्त्री आणि पुरूष स्वरूपात असतात. या अक्षरांना शिव आणि शक्ति या रूपात पाहिले जाते. त्यामुळेच याला शुभ समजण्यात येते. जर तुम्ही 54 या संख्येला 2 ने गुणले तर 54 x 2 = 108 होते. याच कारणामुळे मंत्राचे उच्चारण 108 वेळा करणे शुभ मानण्यात येते आणि त्याशिवाय शिव आणि शक्ति रूपामुळे फलदायी मानण्यात येते. 

काय आहे वैज्ञानिक कारण 

जेव्हा 108 वेळा मंत्रोच्चारण करण्याबाबत बोलले जाते, तेव्हा आपला श्वास हा 24 तासात 21 हजार 600 वेळा घेतला जातो. प्रत्येक व्यक्ती इतके वेळा श्वास घेतो. जेव्हा आपण नियमित दिनचर्येबाबत बोलतो तेव्हा दिवसभरातील बारा तास हे नियमित कामात निघून जातात आणि उर्वरित बारा तास हे आपण देवाच्या भक्तीमध्ये व्यतित करू शकतो. त्यामुळे आपण जर 21,600 च्या अर्धे केले तर 10,800 ही संख्या येते. जेव्हा आपण मंत्रोच्चारण करतो तेव्हा 10,800 वेळा तसं करणं शक्य नाही. याच कारणामुळे त्यापुढी दोन शून्य काढून मंत्रोच्चारण करणे योग्य मानण्यात आले आहे. 

व्यक्तीच्या असतात 108 इच्छा 

सौजन्य – Freepik

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या इच्छेच्या बाबतीत अभ्यास करायचे ठरवता अथवा जाणून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याची संख्या येते ती म्हणजे 108 आणि सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पटीने अधिक आहे. याशिवाय ज्योतिषशास्त्रातही 108 संख्येला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या राशी चक्रातील बारा राशींमध्ये ही संख्या विभाजित आहे. हिंदू धर्मामध्ये 9 ग्रह आहेत. तुम्ही जर गुणाकार करून 12 x 9 केले तर त्याचे उत्तरही 108 असेच येते. त्यामुळे या संख्येला महत्त्वाचे मानले जाते. 

सूर्याच्या कलेशी संबंधित 

सूर्य संपूर्ण वर्षभरात 21,600 वेळा कला बदलतो आणि सूर्याचे चक्र दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्याला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हटले जाते. अशा पद्धतीने सूर्याच्या कला या दोन भागात विभागण्यात आल्या तरीही 10,800 ही संख्या येते. त्यामुळे यातीलही दोन शून्य काढून 108 ही संख्या गृहीत धरण्यात येते. यामुळे मंत्राचा जप करण्यासाठी 108 ही संख्या वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. 

खरे तर 108 ही संख्या शुभ असल्यामुळेच याचा मंत्रोच्चारण करणे अत्यंत फलदायी असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते आणि म्हणूनच जप 108 वेळा केला जातो. 

Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

हाताची करंगळी सांगते तुम्ही कधी होणार श्रीमंत

घरातील शांतता भंग झाल्यासारखे वाटत असेल तर करा या गोष्टी

Leave a Comment