समंथा झुंजतेय या आजाराशी, सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दिला धीर

आपल्या अभिनय आणि फिटनेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी साऊथ इंडियन अभिनेत्री समंथा प्रभू ( Samantha Prabhu) गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियापासून थोडी लांबच दिसतेय. तिच्या आगामी चित्रपट ‘यशोदा’ शिवाय तिच्या फिडवर फारसे काही दिसत नव्हते. त्यामागे तिचे आजारपण असल्याचे आता समोर येत आहे. समंथाने एक पोस्ट करत या संदर्भातील एक माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांना धक्का बसला आहे. इंडस्ट्रीतली अनेकांनी तिला प्रत्यक्ष भेटून बळ दिले आहे तर काहींनी तिला सोशल मीडियावरुन धीर दिला आहे. 

समंथा या आजाराने त्रस्त

समंथा सोशल मीडियापासून दूर आहे हे अलिकडच्या काळात लक्षात येऊ लागले होते. तिच्या कोणत्याही खासगी पोस्ट यात नव्हत्या. घटस्फोटासारख्या मोठ्या निर्णयानंतरही ती सोशल मीडियावर तशी ॲक्टिव्ह दिसली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आगामी यशोदा (Yashoda) या चित्रपटाव्यतिरिक्त फारसे काही पोस्ट करत नाही. तिने नुकताच तिचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पाठमोरी बसलेली दिसत आहे. त्यात तिच्या हाताला सलाईन लागलेली दिसत आहे.  या पोस्टच्या खाली तिने असे लिहले आहे की, 
‘यशोदाच्या ट्रेलरला तुम्ही भरभरुन प्रेम दिले त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत तुमचे प्रेमच मला जगण्याची नवी प्रेरणा देत असते. काही महिन्यांपूर्वी मला झालेल्या ‘मायोसायटिस’ या ऑटोईम्यून आजाराचे निदान झाले. या आजारातून बरी होऊन तुम्हाला याची माहिती देणार होते. पण मला बरे होण्यासाठी थोडा अधिक कालावधी लागणार आहे. डॉक्टरांनाही तो विश्वास आहे. सध्या माझे चांगले आणि वाईट दिवस असे एकत्र सुरु आहेत. कधी कधी निराशा येते. पण ही परिस्थिती लवकरच निवळेल असा विश्वास मला आहे.’ 

चिरंजीवीनी लिहिले पत्र

समंथाला वेगवेगळ्या माध्यमातून धीर दिला जात आहे. साऊथचे ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांनी देखील सोशल मीडियावर समंथाला एक पत्र लिहिले आहे. 

त्यात त्यांनी लिहिले आहे की,
समंथा, आपल्या आयुष्यात वेळोवेळी असे कठीण प्रसंग येत असतात जे आपल्या आत दडलेली ताकद ओळखण्यास मदत करतात. 

तुझ्यामध्ये ते बळ आहे तू यातून लवकर बाहेर पडशील. अशा मला विश्वास आहे. तुझ्यासोबत ही ताकद  अशीच अखंड राहू दे असा विश्वास आहे. 

यशोदाची प्रतिक्षा

समंथाच्या चित्रपटाची निवडही नेहमी वेगळी आणि खास असते. घटस्फोटानंतर तिच्या करिअरचा ग्राफ चांगलाच वर गेला आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटातील आयटम साँग करुन तिने रुल्स ब्रेक केले होते. त्यासाठी तिची प्रशंसाही खूप झाली. आता तिचा यशोदा हा चित्रपटही थोडा वेगळा आहे. त्यातही तिने घेतलेली अभिनयाची मेहनत दिसून येत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आता अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता हा चित्रपट कधी येतोय याची प्रतिक्षा आहे

Leave a Comment