मांड्यांचा आतील भाग काळा असण्याची समस्या अनेकांना असते. सर्वसाधारणपणे खूप महिलांना हा त्रास असतो. तुमच्याही मांड्याचा आतला भाग काळा झालेला वाटत असेल तर त्याकडे आताच लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्याकडे दुर्लक्ष केले तर कालांतराने तो भाग अधिक काळा दिसू लागतो. मांड्यांना मांड्या घासण्याचा त्रास हा देखील या मागे असू शकतो. पण मांड्याचा काळा झालेला आतला भाग पूर्ववत व्हावासा वाटत असेल तर काही सोपे उपाय तुम्ही नक्की करु शकता. त्यामुळे तो काळेपणा कमी होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल.
माईल्ड स्क्रब

हल्ली बाजारात खास प्रायव्हेट पार्टच्या सुरक्षेसाठी चांगले स्क्रब मिळतात. हे लाईट स्क्रब तुम्ही आठवड्यातून एकदा वापरु शकता. खरंतर शऱीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत ही त्वचा सगळ्या गोष्टपासून आत असते. येथील त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळेही येथील त्वचेचा रंग इतर त्वचेहून अधिक गडद दिसतो. अशावेळी थोडे माईल्ड स्क्रब वापरले तर त्यामुळे तेथील त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत मिळते. त्यामुळे त्वचेवरील एक मृत त्वचेचा थर निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे असे माईल्ड स्क्रब तुम्ही विकत आणा किंवा घरीच काही सोपे स्क्रब बनवा
या Homemade Face Scrub मुळे पोर्स राहतील स्वच्छ
उदा. साखर- मध, कॉफी स्क्रब
मॉश्चरायझर
चांगल्या त्वचेसाठी मॉश्चरायझर हे देखील खूप महत्वाचे असते. मांड्यांच्या आतला भागाला आपण मॉश्चरायझर लावायला बघत नाही. पण त्यामुळेच येथील त्वचा ही अधिक रुक्ष आणि कोरडी होऊ लागते. त्यामुळे आंघोळीनंतर या भागाला मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरु नका.मॉश्चरायझर हे लाईट असायला हवे. मॉश्चराझर लावल्यानंतर लगेच कपडे घालू नका. ते थोडे मुरु द्या. मॉश्चरायझर जर तसेच राहिले तर त्यामुळे मांड्या घासण्याची शक्यता अधिक असते.
Beauty Care Tips: टॅनिंगमुळे चेहरा झाला असेल काळा, तर वापरा दही
बटाट्याचा रस
बटाटा हा लाईटनिंग एजंट म्हणून ओळखला जातो. बटाटा किसून जर तुम्ही त्याचा रस त्या ठिकाणी लावला तर तेथील त्वचा ही थोडी लाईट होण्यास मदत मिळते. पण हा प्रयोग आठवड्यातून एकदा करायचा आहे. कारण खूप जणांना बटाट्याचा रस लावल्यानंतर त्रास होतो. जर तुम्हाला बटाट्याचा रस लावल्यानंतर हा त्रास झाला तर तुम्ही त्याचा प्रयोग न करणे हेच चांगले.
ॲलोवेरा जेल

मांड्यांची त्वचेमध्ये मॉश्चर चांगले टिकून राहण्यासाठी ॲलोवेरा जेल हा बेस्ट पर्याय आहे. ॲलोवेरा जेल हे त्वचेला थंडावा देण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही मांड्यांना नियमितपणे ॲलोवेरा जेल लावा. त्यामुळे त्वचा जर घासली गेली असेल तर ती बरी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही नियमित रात्री झोपताना ॲलोवेरा जेल लावा.
मांड्यांचा काळेपणा घालवण्यासाठी काही खास ऑईन्मेट बाजारात मिळतात त्यांचा उपयोग करुन देखील तुम्हाला त्याचा काळेपणा कमी कऱण्यास मदत मिळू शकते. शिवाय हल्ली अनेक अशा ट्रिटमेंट्स आहेत. ज्यामध्ये तुमच्या मांड्या लाईट करण्यासाठी काही खास पीलिंगचा उपयोगही केला जातो. पण आधीह काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा.