गश्मीर महाजनीची विजयाकडे घोडदौड, झलकच्या फिनालेमध्ये पोहचला गश्मीर

‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhhla Jaa 10) सध्या शेवटच्या आठवड्यात येऊन पोहचला आहे. शो च्या फिनाले साठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या आठवड्यात सेमी फायनल असून मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) फिनालेमध्ये पोहचल्याचे सध्या सांगण्यात येते आहे. पहिल्याच आठवड्यापासून प्रेक्षकांचेच नाही तर अगदी परीक्षक करण जोहर (Karan Johar), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांची मने आपल्या नृत्याने गश्मीरने जिंकली.

गश्मीरचा प्रवास

कर्जातून आपल्या आईवडिलांना बाहेर काढत नृत्यशाळा उघडली आणि मग गश्मीरने कधी मागे वळून पाहिलेच नाही. मराठी चित्रपट असो वा हिंदी मालिका गश्मीरचं नाव सध्या सगळ्यंच्याच तोंडी आहे. गश्मीरचा हा पहिला रियालिटी शो आहे. तसंच मराठीमध्ये लहान मुलांच्या डान्स महाराष्ट्र डान्स या शो चा गश्मीर परीक्षक होता. पण रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून गश्मीर पहिल्यांदाच सहभागी झाला आणि त्याने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. गश्मीर अत्यंत तगडा स्पर्धक असून या शो मध्ये तोच विजेता होईल असं म्हटलं जात आहे. झलकमधील सर्वाधिक ‘गोल्डन चेअर’ पटकावण्याचा मानही गश्मीरकडेच आहे. त्याशिवाय सर्वाधिक 30 गुणही गश्मीरलाच मिळाले आहेत. निशांत भट (Nishant Bhatt) आल्यानंतर गश्मीरचे काय होणार असे अनेकांना वाटत होते. मात्र गश्मीरने निशांतलाही चांगलीच टक्कर दिली आहे. फिनालेमध्ये जाण्यासाठी यामुळेच गश्मीरला आता जास्त त्रास होणार नाही. मात्र फिनालेमध्ये गश्मीर कसा परफॉर्मन्स देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ओटीटीवरही गाजवत आहे गश्मीर

गश्मीर गेल्या एक दोन वर्षांपासून हिंदीमध्ये चांगलाच स्थिरावलेला दिसून येत आहे. रियालिटी शो शिवाय गश्मीर ओटीटीवरही वेबसिरीजमध्ये दिसून येत आहे. तसंच त्याला अनेकदा हिरो मटेरियल म्हटल्यामुळे आणि त्याची शरीरयष्टी पाहता लवकर हिंदी चित्रपटात दिसल्यास नवल वाटायला नको. रोहित शेट्टीनेही (Rohit Shetty) आपल्या पुढच्या सीझनसाठी ‘खतरों के खिलाडी’ (Khatron ke Khiladi) गश्मीरला सर्वांसमोर विचारणा केली होती. आपल्या शो मध्ये पुढच्या वर्षी गश्मीरने सहभागी व्हावे अशी इच्छा सर्वांसमोर रोहितने बोलून दाखवली होती. त्यामुळे गश्मीरची गाडी सध्या सुसाट असून त्याची झलकच्या ट्रॉफीच्या दिशेने विजयाची घोडदौड सुरू आहे असंं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर सोशल मीडियावर सध्या गश्मीरच ही ट्रॉफी जिंकणार अशी चर्चा आहे. पण त्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागेल हे नक्की. 

सेमीफायनलमध्ये निशांत भट, निया शर्मा, रूबिना दिलैक, निती टेलर, श्रीती झा आणि फैजल शेख यांच्यात चढाओढ होणार आहे. यामधून गश्मीरला कोण टक्कर देणार याची आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Leave a Comment