नकारात्मक उर्जा जाणवते? अशी दूर करा नजरेची बाधा

 अचानक आजारपण, काम बिघडणे किंवा कितीही प्रयत्न करुन कोणत्याच गोष्टी चांगल्या न होणे असे कधी तुमच्यासोबत घडले आहे का? असे तुमच्यासोबत घडले असेल काहीजण  याला नजर लागणे असे म्हणतात. अचानक कोणतेही कारण नसताना असे काही झाले की, पूर्वीची लोकं अगदी हमखास नजर काढण्याचे काम करायची. ‘आल्या गेल्याची…..वाटसरुची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे’असे म्हणत अंगावरुन नकारात्मक उर्जा काढण्याचे काम आजी किंवा घरातील मोठी माणसे करत. आजही कधी अचानक असे काही झाले की, आपण अगदी हमखास नजर काढतो. मोठ्यांची कमी पण लहान मुलांची तर नजर आपण अगदी हमखास काढतो. तुम्हालाही तुमच्यासोबत असे काही झाल्यासारखे वाटते का? तुमचाही हातातोंडाशी आलेला घास अचानक हिरावून घेतला आहे. असे वाटत असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने नकारात्मक उर्जा काढता येईल.(How to keep Away Evil eye)

मीठ-मोहरी

मीठ मोहरीने काढा नजर

मीठ आणि मोहरी घेऊन नजर काढण्याची पद्धत ही सर्वश्रूत आहे.  अगदी पटकन नजर काढायची असेल तर हातात मीठ- मोहरी घेऊन नजर काढली जाते. मीठ हे नकारात्मक उर्जा काढून टाकण्यासाठी खूपच चांगले मानले जाते.त्यामुळे जर तुम्हाला नकारात्मक उर्जेने ग्रासले असेल तर ती उर्जा मीठासोबत निघून जाते. मीठ हे मॅग्नेटचे काम करते असे म्हणतात. काळ्या रंगाची मोहरी ही देखील नजर उतरवण्याचे काम करते. त्यामुळे मीठ मोहरीने दृष्ट काढणे फार सोपे आहे. ही नजर तुम्ही अगदी कधीही काढू शकता. 

लालसुक्या मिरच्यांनी नजर काढणे

नजर काढण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. त्यामध्ये लालसुक्या मिरच्या या देखील अनेकदा वापरल्या जातात. माझ्या लहानपणी मला सांभाळणाऱ्या आई या माझी नजर काढताना कायम सुक्या मिरच्या आणि मीठ- मोहरीचा वापर करत. एक तवा घेऊन त्या हातात मीठ- मोहरी आणि मिरच्या घेत. त्यानंतर ती नजर लागलेल्या व्यक्तीच्या भोवती गोलाकार फिरवली जातं. साधारण 3 ते 5 वेळा असे केल्यानंतर तव्यावर ती मिरची टाकून ते पेटवून दिले जातं. आता जर या मिरच्यांचा ठसका आला नाही तर नजर चांगलीच लागली असे म्हटले जातं. 

कवट बावला

अंड्याचा उपयोग करुनही नजर काढण्याची पद्घत खूप ठिकाणी आहे. कवट अर्थात कच्च अंड घेऊन त्यावर काळ्या रंगाच्या खडूने किंवा राखेने डोळे आणि तोंड काढले जाते. ज्याला नजर लागली त्याच्याभोवती अंड ओवाळून ते अंड तिठ्यावर ठेवले जाते. हे अंड उतरवणारी व्यक्ती इथे तिथे कुठेही थांबत नाही. तर ती थेट तिठ्यावर जाऊन ते अंड ठेवते. हा प्रयोग शनिवार किंवा रविवारी रात्री केला जातो. 

तमालपत्र- कापूर आणि लवंग

कापूर-लवंग आणि तमालपत्राने नजर काढणे

 हल्ली काही अभ्यासात नजर काढण्याची काही वेगळी पद्धत ही सांगितली जाते. त्यापैकी एक परिणामकारक अशी पद्धत म्हणजे कापूर -लवंग आणि तमालपत्राची. जर तुम्हाला तुमच्या खोलीत सतत काहीतरी नकारात्मकतेचा भास होत असेल तर अशावेळी तुम्ही एका भांड्यात एक दोन तमालपत्र, कापूर आणि लवंग घेऊन ते पेटवा. ते घरभर रुममध्ये फिरवा. त्यामुळे तुमच्या घरात असलेली नकारात्मक उर्जा निघून जाते असे सांगितले जाते. 

अशाप्रकारे तुम्ही नजर लागण्यापासून स्वत:चे संरक्षण करु शकता. 

(Dazzlemarathi अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही. पण अनेकांनी या गोष्टींना दुजोरा दिल्यामुळे त्या फक्त माहिती हेतूने शेअर करत आहोत.)

Leave a Comment