पुरुषांमधील हृदयविकाराची लक्षणे कोणती

हृदयविकार (Heart Attack) हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हृदयाची विफलता, कोरोनरी हार्ट डिसीज, एनजाइना आणि ऍरिथमिया यासारख्या काही हृदयासंबंधित समस्या सामान्यतः दिसून येतात. खालील लेखात आम्ही तुम्हाला हृदयविकाराच्या काही महत्त्वाच्या लक्षणांबद्दल (Heart Attack Symptoms For Men) सांगत आहोत ज्याकडे पुरुषांनी दुर्लक्ष करू नये. धोक्याच्या संकेताविषयी या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. डॉ. बिपीनचंद्र भामरे, मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे  (Sir H.N.Reliance Foundation Hospital and Research Center) सल्लागार कार्डियाक सर्जन यांनी ही माहिती दिली आहे.

वयोवृद्ध लोकांमध्ये किंवा प्रौढ व्यक्तींमध्ये आणि पुरुष असो वा स्त्री हृदयविकार ही खूप सामान्य घटना ठरत आहे. बैठी जीवनशैली ही हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलची उच्च पातळी आणि रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण, धूम्रपान करणे आणि तणावाचे सेवन हे हृदयविकाराला बळी पाडू शकतात. इतकेच नाही तर कौटुंबिक इतिहास असल्यास भविष्यात हा विकार जडण्याची दाट शक्यता असते. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेत हृदयाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळणे आवश्यक आहे. येथे, आम्ही हृदयविकाराची काही लक्षणे सूचीबद्ध करतो जी एखाद्याने योग्य वेळी ओळखली पाहिजेत.

पुरुषांमधील हृदयविकाराची ही लक्षणे आहेत

अस्वस्थता जाणवणे : काही लोकांना असे वाटते की त्यांच्या छातीत धक्का बसून जळजळ झाल्याचे दिसून येते. असे विशेषतः चालल्यानंतर किंवा काही काम केल्यानंतर दिसून येते. छातीत अस्वस्थता काही पुरुषांमध्ये कोरोनरी धमनी रोग दर्शवू शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानंतरच उपचार सुरू करणे चांगले.

मळमळ, अपचन आणि पोटदुखी: काही रुग्णांमध्ये पोटदुखी हे हृदयविकाराचे प्राथमिक लक्षण असते.

हातासंबंधित वेदना: जेव्हा वेदना छातीतून डाव्या हाताकडे पसरते तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका म्हणतात. डाव्या खांद्यावर आणि हातामध्ये सुन्नपणा आणि अशक्तपणा देखील दिसू शकतो.

चक्कर येणे: जर हृदय मेंदू आणि इतर भागांमध्ये रक्त पंप करण्यास असमर्थ ठरत असेल, तर एखाद्याला चक्कर येणे किंवा डोकेदुखी देखील जाणवू शकते. शरीरात आवश्यक प्रमाणात रक्त प्रवाह नसताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हे घडू शकते. हलकीशी डोकेदुखी आणि चक्कर येणे हा हृदयाच्या ट कार्डिओमायोपॅथीशी संबंधित त्रास असू शकतो.

छातीत दुखणे किंवा एनजाइना ही छातीतील वेदना आहे जी डाव्या खांद्यावर किंवा घशापर्यंत पसरते. हे चालणे किंवा इतर क्रियाकलाप केल्यानंतर घडते. कोणताही त्रास जाणवत असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगण्यास अजिबात संकोच करू नका. जेणेकरुन तुम्ही पुढील तपासणी वेळेत करु शकाल आणि योग्य उपचार घेणे शक्य होईल.

Leave a Comment