मुलांना कॉफी पाजणे योग्य की अयोग्य, कॉफी कधी सुरू करावी

एक अशी वेळ होती जेव्हा मुलांना दूध देणे हे सर्वात पौष्टिक मानले जात होते. दिवसभरात मुलं दोन ते तीन ग्लास दूध पित होती. पण आता मुलांची चव बदलली आहे. आता मुलांना सतत फास्ट फूड, चीज अशा फ्लेवरची गरज असते. तर काही पालक हे लहानपणापासूनच मुलांना चहा अथवा कॉफीचीही सवय लावतात. बऱ्याच मुलांना कॉफीची चव आवडते. पण प्रश्न असा आहे की, मुलांना कॉफी (Coffee) पाजणं योग्य आहे की नाही? कारण लहान वयातच त्यांना कॉफीची सवय होते. त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? तुमच्या मनातही असे काही प्रश्न असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. 

मुलांना कॉफी देणं योग्य आहे का?

सौजन्य – Freepik.com

खरं तर लहान मुलांना कॉफी देणं अजिबात योग्य नाही. कारण मुलांना यामुळे नुकसान पोहचू शकते. अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचाही मुलांना सामना करावा लागू शकतो. एका शोधानुसार हे सिद्ध झाले आहे की, कॉफीच्या सेवनामुळे मुलांच्या झोपेवर परिणाम होते. जे त्यांच्या वजनावर आणि शारीरिक विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. तसंच जी मुलं कॉफी पितात त्यांना मानसिक त्रासाला अथवा नैराश्यालाही सामोरे जावे लागते असंही सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुलांना कॉफी न देणंच योग्य 

लहान मुलांना कॉफी देण्याचे दुष्परिणाम (Side Effects of Coffee For Children)

सौजन्य – Freepik.com

कॅफिनचे सेवन करण्याने अंगातील कॅल्शियम (Calcium) कमी होते, त्यामुळे हाडांना सर्वात आधी नुकसान पोहचते. कॉफी ना केवळ शरीरामधील कॅल्शियमची पातळी कमी करते, तर यामुळे मुलांचा शारीरिक विकासही खंगतो. 

  • जी मुले लहान वयात कॉफीचे सेवन करू लागतात, त्यांना अधिक भूक लागत नाही. पण मुलांसाठी अन्न हे शरीराचा विकास घडण्यासाठी उपयुक्त आहे
  • एका शोधानुसार, जी मुलं कॉफीचे सेवन करतात त्यांची एकाग्रता होत नाही आणि त्यांना भीतीची समस्याही उद्भवते. कारण कॅफीनचा अधिक डोस पोटात गेल्यास, मुलांच्या नर्व्हस सिस्टिम (Nervous System) वर अधिक परिणाम होतो 
  • मुलांच्या विकासासाठी झोपेची गरज असते. पण कॅफिनच्या सेवनामुळे मुलांची झोप उडते आणि मग त्यांच्यात अधिक चिडचिडेपणा दिसून येतो
  • कॉफीमधील कॅफेन हे शरीरात अधिक उत्तेजना जागृत करते. त्यामुळे मुलांना सतत कॉफी पिण्याची इच्छा होते आणि मग त्याची एक सवय लागून जाते, जी पटकन सोडविणे कठीण होते 
  • कॉफीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे कॉफी पिणाऱ्या मुलांना दातदुखीसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. कॉफी तुमच्या तोंडामध्ये बॅक्टेरिया अधिक प्रमाणात वाढवते, ज्याचा दातावर परिणाम होतो. दातामधील अॅसिड वाढवून दाताचे इनेमल नष्ट करण्याचे काम कॉफी करते 
  • कॉफीच्या सेवनामुळे मुलं डिहाड्रेशननेदेखील ग्रस्त होतात. कॉफी प्यायल्यामुळे मुलांना सतत लघ्वीला जावे लागते आणि शरीरातील पाणी पटकन कमी होते. तसंच जी मुलं लहान वयात अधिक कॉफी सेवन करतात त्यांना लहान वयातच मधुमेहासारख्या आजाराला सामोरं जावं लागतं

कोणत्या वयात आणि किती प्रमाणात मुलांना कॉफी द्यावी 

तुमच्या मुलांचे वय 12 पेक्षा अधिक असेल तर तुम्ही त्यांना कॉफी देऊ शकता. पण लक्षात ठेवा याचे प्रमाणे 100 मिलीग्रॅम अर्थात एक कपापेक्षा अधिक असू नये. तुमच्या मुलाचे वय 12 पेक्षा कमी असेल तर तुम्ही अजिबात त्यांना कॉफी देऊ नये. कारण हे त्यांच्या शरीराच्या आणि मानसिकदृष्ट्याही नुकसानाचे ठरू शकते. 

Leave a Comment