हसीन दिलरुबा 2 लवकरच, रहस्य आणि ड्रामासाठी व्हा सज्ज

2022 मध्ये नेटफ्लिक्सवर आलेला हसीन दिलरुबा (Hasseen Dilruba) चित्रपट आपल्यापैकी कित्येकांनी पाहिला असेल. एक लव्हस्टोरीसारखी वाटणारीच पण वेगळाच टर्न घेणारी स्टोरी सगळ्यांनाच या चित्रपटाच्या माध्यमातून आवडली होती. शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारा असा हा चित्रपट होता. तापसी पनू, विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे स्टारर या चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. पण आता पुन्हा एकदा हसीन दिलरुबा (Haseen Dilruba)चे निर्माते याचा सिक्वल घेऊन येणार आहेत. या आधी या चित्रपटाची केवळ चर्चा होत होती. पण आता यावर तापसी पन्नू, आनंद एल राय, कनिका ढिल्लन यांनी दुजोरा दिला आहे.

प्रमोशनचा अनोखा फंडा

चित्रपट हिट होण्यामागे त्याचे सादरीकरण तितकेच महत्वाचे असते. त्यात एखादा आवडलेल्या चित्रपटाचा सिक्वल करायचा असेल तर त्या मागील चित्रपटाची कहाणीही माहीत असायला हवी असते.येणाऱ्या सिक्वलचा संकेत देण्यासाठी यांनी असाच एक वेगळा फंडा वापरल्याचे दिसत आहे. ट्विट करत तापसी, आनंद एल राय आणि कनिका ढिल्लन एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहे. यामध्ये या दोघांनी हसीन दिलरुबा कशी असणार याबद्दल थोडी हिंट दिली आहे.  पण मजेदार गोष्ट अशी की, यामध्ये तापसीने याची माहिती तिच्या चाहत्यांना स्वत:हून का दिली नाही याबद्दल आनंद एल राय यांनी विचारणा केली आहे. त्यामुळे या चित्रपटासोबत इतर गोष्टींचीही चर्चा होणे अगदी स्वाभाविक आहे.

रानी कश्यपची कहाणी

ही गोष्ट आहे रानी कश्यप आणि रिशूची. यात रिशू मरताना दाखवण्यात आला आहे. एका अपघातात त्याचे निधन होते. रानीवर खुनाचा आरोप येतो. पण तिने खरंच खून केला आहे की नाही हे दाखवणाराच ट्विस्ट या चित्रपटात आहे जो तुम्ही अगदी हमखास पाहायला हवा. या चित्रपटात तापसीचा अभिनय हा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. इतकेच काय तर वेबसिरीजतून घराघरात पोहोचलेला विक्रांत तर आधीच लोकांच्या आवडीचा आहे. त्यामुळे आता याच्या सिक्वलमध्ये तो कोणत्या रुपात पाहायला मिळणार आहे ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

येणार मोठा ट्विस्ट

हसीन दिलरुबा (Haseen Dilruba)चे शूटिंग सुरु झाले आहे. यंदा या चित्रपटात अधिक रहस्य आणि तितकीच मजा असणार आहे. या सिक्वलमध्ये पुन्हा एकदा विक्रांत मॅसी आणि सनी कौशल दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अधिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की! अनेकदा एखाद्या चित्रपटाचा सिक्वल येणार म्हटल्यावर तो अगदी परफेक्ट असणे गरजेचे असते. आता या चित्रपटालाही तसेच परफेक्ट असणे गरजेचे असणार आहे. 

तुम्ही अद्याप हसीन दिलरुबा (Haseen Dilruba)चा पहिला भाग पाहिला नसेल तर नक्कीच पाहा आणि दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करा

Leave a Comment