गेल्या काही दिवसापासून आजारी आहे बिग बॉस फेम ही अभिनेत्री

बिग बॉसमुळे घराघरातून पोहोचलेली अभिनेत्री महल चहक (Mahak Chahak) ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. याचे कारण ती आजारी असल्याचे कळत आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री इतकी आजारी होती की तिला व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले होते असे कळत आहे. सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळत आहे. तिने तिच्या आजारी असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

श्वास घेण्यास होत होता त्रास 

एका खासगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 2 जानेवारी रोजी महक (mahak chahal) ची तब्येत अचानक खालावली. तिला श्वास घेण्यास अडथळा येत होता. तिच्या छातीत दुखत होते. तिला त्याच क्षणी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर चाचण्या केल्यानंतर तिच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याचे समजले. त्यानंतर तिला तातडीने व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले.(Health Issue) वेळीच उपचार घेतल्यामुळे तिच्या प्रकृतीत आता सुधारणा दिसत आहे. तिने तिच्या चाहत्यांना याची माहिती एका पोस्ट द्वारे दिली आहे. महक ही तिच्या सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. तिने काही दिवस पोस्ट शेअर न केल्यामुळे खूप जणांना काळजी वाटत होती. पण आता तिने एका बातमीसह आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने यात लिहिले आहे की, ‘मी न्युमोनियामधून आता बरी होत आहे. या काळात तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि काळजीच्या पोस्ट या सगळ्यासाठी मी आभारी आहे. सध्या मी घरी असून मला आराम करणे गरजेचे आहे. लवकरच बरी होऊन मी तुम्हाला एंटरटेन करायला येणार आहे.’

नागिन 6 मध्ये करते काम

हिंदी मालिकांमधील नागिन ही मालिका कोणाला माहीत नाही असे अजिबात होणार नाही. या मालिकेचा 6 वा सीझन सुरु आहे. या मालिकेत ती नागिनच्या भूमिकेत आहे. तिने या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतलेली दिसत आहे. विलनची भूमिका साकारतानाही अनेकदा तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. महक ही नक्कीच फिट आणि आपल्या कामाशी खूपच एकनिष्ठ असलेली दिसते. त्यामुळेच तिची अनुपस्थिती अनेकांना जाणवत होती. 

बिग बॉसमधून मिळाले फेम

बिग बॉसमध्ये गेलेल्यांना फेम मिळाले नाही असे कधीच होत नाही. महक चहल ही बिग बॉसच्या 5 व्या सीझनमध्ये होती. त्यानंतर तिला खूपच चांगली अशी ओळख मिळाली. जुही परमारच्या सीझनमध्ये ती होती. बिग बॉसमध्ये ती जुही परमारच्या खूप जवळ होती. तिचे आयुष्य कष्टप्रद असे होते. तिने स्ट्रगल करुन आपले आयुष्य जगले आहे. तिचे खरे बोलणे हाच तिचा स्वभाव होता. जो अनेकांना आवडत होता. 

सध्या ती नागिनच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही काळासाठी ती ब्रेकवर आहे. पण ती नक्कीच परत येईल.  

Leave a Comment