‘वेड’ चित्रपटाने सगळ्यांनाच लावले वेड,शोज हाऊसफुल्ल

 रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट नुकताच सगळ्या महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे प्रमोशन रितेश आणि जेनिलिया या जोडीने अनेक ठिकाणी केले. त्यालाच चांगले यश आले असे म्हणायला हवे. कारण मराठीत खूप दिवसांनी चांगला चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला हा चित्रपट रिलीज झाला खरा. पण त्याला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले असून अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल सुरु आहेत. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने दमदार अशी कमाई केली आहे.

चित्रपटात आवडली रितेश- जेनेलियाची जोडी

 रितेश- जेनिलिया ही जोडी अशी ही पावर कपल जोडीमधील एक जोडी आहे. त्यांच्यावर प्रेक्षकांचे कायम प्रेम असते. आता ‘वेड’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र स्क्रिन शेअर करताना ही जोडी दिसली याचाच आनंद अनेकांना आहे. चित्रपटात एक इच्छित लव्हस्टोरी नसली तरी ज्या पद्‌धतीने यामध्ये एक प्रेम दाखवण्यात आले आहे. त्या प्रेमाला पाहून अशी असावी लव्हस्टोरी असे तोंडी आल्यावाचून राहणार नाही. त्यातच जेनिलियाचा मराठीतील अभिनयही फार जणांना भावलेला दिसतो. तिची मराठी ही थोडी  वेगळी असली तरी देखील तिने केलेला प्रयत्न हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.  हा चित्रपट साऊथच्या ‘मजली’ या चित्रपटाचा रिमेक आहे. साऊथच्या चित्रपटात समंथा प्रभू- नागा चैतन्य ही जोडी दिसली होती. त्यांनाही खूप प्रेम मिळाले होते.

पहिल्याच दिवशी उत्तम कमाई

मिळालेल्या माहितीनुसार ‘वेड’  चित्रपटाचे बजेट हे केवळ 15 कोटी इतके आहे.  शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 3.50 कोटीची कमाई करत टॉप 5 मराठी चित्रपटात आपले नाव नोंदवले आहे. या आधीच सैराट, टाईमपास, लयभारी, नटसम्राट या चित्रपटाचा समावेश आहे. त्यात आता ‘वेड’ या चित्रपटाचे नावही घेतले जाणार आहे. एकूणच ‘वेड’ साठी ही कमाई चांगली आहे. यापुढेही अनेक शोज हाउसफुल्ल असतील असेच दिसत आहे. 

अजय- अतुलचे संगीत

 ‘वेड’ या चित्रपटाची खासियत अशी की या चित्रपटाला संगीत अजय- अतुलचे आहे. ज्या मराठी चित्रपटाचा अजय- अतुल यांचे संगीत असते. त्यातील गाणी ही आधीच वायरल होऊ लागतात. यामधील गाणीही तितकीच सुंदर आणि मनाला भावणारी आहे. यातील ‘वेड’ हे गाणं खूप जणांच्या प्ले लिस्टमध्ये आधीच जागा कऱण्यास यशस्वी झाले आहे.

प्रेमातील वेड

 प्रेम सगळ्यांना होतं पण प्रत्येकाची लव्हस्टोरी ही  सारखी नसते. काहींना अनेक कठीण प्रसंगातून जावे लागते. त्यांतर कुठे त्यांचे प्रेम यशस्वी होते. काहींच्या प्रेमाची स्वप्न ही अपूर्ण राहतात. अशावेळी होणारे दु:ख या चित्रपटातून पाहायला मिळेल.

 तुम्हीही एखाद्यावर वेड्यासारखे प्रेम केले असेल तर त्या प्रेमासाठी तुम्ही हा चित्रपट पाहायला हवा. 


Leave a Comment