राखी सावंत अखेर अडकली विवाहबंधनात, फोटो केले शेअर

ड्रामा क्वीन म्हणा किंवा काहीही राखी सावंत (Rakhi Sawant) ही काही ना काही कारणाने चर्चेत असते. आताच ती बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आली आहे. पण ती बाहेर येत नाही तोच तिने लग्न केल्याची बातमी समोर आली आणि अनेकांना धक्का बसला. आधी तर पुन्हा ही अफवा असेल असे वाटले होते. पण नाही राखीच्या लग्नाची बातमी ही ‘सोला आणे सच’ आहे. राखी सावंतने आदिल दुराणीशी (Adil Durani) लग्न केले आहे. काहीच महिन्यांपूर्वी सुरु झालेली ही लव्हस्टोरी आता पूर्ण झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही. राखीने तिच्या या खासगी लग्नाचे फोटो आणि व्हिडिओज रिलीज केले आहेत.

राखीने केले अगदी छोटेखानी लग्न

राखीचे आदिल दुराणी (Aadil Durrani) सोबत अगदी काहीच महिन्यांपासून प्रेम सुरु झाले आहे. तिचे पहिले लग्न तुटल्यानंतर तिच्या आयुष्यात आदिल आल्याचे तिने सांगितले. आदिल दुराणी हा तिच्यापेक्षा वयाने लहान असून तो उद्योगपती आहे. त्याने तिच्या वाढदिवसासाठी एक महागडी कार गिफ्ट केली होती. राखीचे हे गिफ्ट आणि गिफ्ट देणारा याकडे सगळ्यांचे अधिक लक्ष लागले. अखेर राखीने आपल्या बॉयफ्रेंडची ओळख सगळ्यांना करुन दिली. राखीचा नवा बॉयफ्रेंड पाहिल्यानंतर अनेकांना राखी पुन्हा एकदा फसवते असे वाटले होते. पण राखी ही कालांतराने बदलत गेली. आदिलच्या येण्याने तिच्या आयुष्यात बराच फरक पडला. तिच्यातील तो वेगळेपणा आणि प्रेमातील वेडेपणा सगळ्यांनी अनुभवला. तिने तिचे विचित्र व्हिडिओ बनवणेही बंद केले. आता फायनली तिने आदिलशी घरातल्या घरात लग्न केले आहे. तिचे लग्न हे मुस्लिम पद्धतीने झाले हे तिच्या फोटोवरुन कळत आहे. यंदा तिने केलेले लग्न खरं आहे हे मात्र नक्की!

राखीने घेतला लग्नाचा निर्णय

राखी आदिलसोबत असे अचानक लग्न करेल हे कोणालाही माहीत नव्हते. पण गेल्या काही वर्षांपासून राखीची आई खूपच आजारी आहे. तिच्या आईला कॅन्सर झाला असून आताही तिच्या आईची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समोर येत आहे. तिच्या आईची प्रकृती पाहता कदाचित आईच्या गंभीर प्रकृतीमुळेच तिने लग्नाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज अनेकांनी बांधला आहे. 

आधीचे लग्न खरे की खोटे

राखी सावंतने आदिल दुराणीच्या आधी रितेश नावाच्या मुलाशी गपचूप लग्न केले होेते. त्यावेळीही तिने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. पण त्यावेळी तिने तिच्या नवऱ्याचे नाव वगळता सगळ्या गोष्टी या गुपित ठेवल्या होत्या.कालांतराने तिने बिग बॉसमध्ये या सगळ्या गोष्टीचा उलगडा केला. तू खोटं लग्न केले असे म्हणणाऱ्यांची तोंड तिने रितेशला बिग बॉसमध्ये आणून बंद केली.  रितेश आला त्यांच्यात वाद झाला , त्याच्यावर आरोप आला असे बरेच काही झाले. त्यानंतर दोघांनी वेगळे राहणे पसंत केले. राखीचा नवरा रितेश हा आधीच लग्न झालेला होता. त्याचे एक कुटुंब होते आणि त्याने कोणालाही न सांगता लग्न केले होते. 

आता राखीने घेतलेला नवा निर्णय सगळ्यांनाच आवडला आहे. राखीचे हे प्रेम अनेकांनी पाहिले आहे. पण आता जाऊन राखीला तिचा लाईफपार्टनर मिळाला आहे असे दिसत आहे. 

Leave a Comment