बाजारातून ताजा आणि योग्य हिरवा पालक कसा निवडाल, योग्य ट्रिक

पालक (Spinach) एक अशी भाजी आहे जी सगळ्यांच्याच घरामध्ये शिजते. पालक खाण्याचे अनेक फायदेदेखील आहेत. तसंच पालकामुळे चांगले पोषण मिळते त्यामुळे अनेकांच्या डाएटमध्ये पालकाचा समावेश करण्यात येतो. पालक तसं पाहायला गेलं तर बारा महिने बाजारात असतो. पण पावसाळ्यात आणि थंडीत अधिक ताजा आणि हिरवागार पालक दिसतो. पण पालक ताजा आहे की नाही याबाबत अंदाज लावणं अनेकांना जमत नाही. त्यामुळे काही जण जसा मिळेल तसा पालक उचलून घेऊन येतात. पण तुम्ही जेव्हा बाजारात पालक खरेदी (Spinach Buying) करायला जाल, तेव्हा काही गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. उदा. पालकाचा रंग, पालकाचा दर्जा याकडे तुमचे लक्ष हवे. पालक खरेदी करण्याच्या काही ट्रिक्स आहेत, त्या आम्ही इथे तुम्हाला सांगत आहोत. या टिप्स वापरून तुम्ही योग्य पालक खरेदी करू शकता. 

पालकचा रंग (Color of Spinach)

चांगला पालक खरेदी करण्यासाठी तुम्ही त्याच्या रंगावर लक्ष देण्याची जास्त गरज आहे. कारण पालकचा रंग हा गडद हिरवा कधीच नसतो. तर हिरवा आणि पिवळा असा मिक्स रंग असणारा पालक भाजीसाठी योग्य ठरतो. त्यामुळे तुम्ही एकदम गडद हिरव्या रंगाचा पालक खरेदी करत असाल तर असं करू नका. कारण यामध्ये ड्युप्लिकेट रंगाचा वापर करण्यात आलेला असतो, जो तुमच्या तब्येतीसाठी योग्य ठरत नाही. हिरवा पिवळसर पालक तुम्ही खरेदी केल्यास, तो योग्य ठरतो. 

जाड पालकची करा खरेदी 

सौजन्य – Freepik

तुम्ही पालक खरेदी करत असाल तर तुम्ही जाड पालक खरेदी करा. यामुळे तुम्हाला केवळ तो कापण्यात सोपे जाणार नाही तर हा पालक अधिक ताजा असल्याने पटकन कापला जाईल. तसंच पालकांच्या पानामध्ये कोणत्याही भेगा नाहीत ना याचीही शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. पालकाच्या पानांना अधिक भेगा दिसत असतील तर असा पालक खरेदी करू नका. कारण असं असेल तर त्यामध्ये कीड लागलेली असण्याची शक्यता अधिक असते. पालक खरेदी करण्यापूर्वी दोन्ही बाजूने पालकाची पानं तपासून घ्या. 

लहान पानांची खरेदी करू नका 

पालक कापण्याची प्रक्रिया किती कठीण आणि कंटाळवाणी असते हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही लहान पानं असणारे पालक खरेदी करू नका. मध्यम आकाराचे वा मोठ्या आकाराची पानं असणारे पालक जुडी तुम्ही खरेदी करा. कारण लहान पानांमध्ये कीड असते आणि त्याशिवाय लहान पानं कापण्यास अधिक त्रास होतो. त्यामुळे जाडसर आणि मोठी पानं असणारे पालक खरेदी करा. तसंच पालकाची जुडी खरेदी करताना तुम्ही ती उघडून खरेदी करा. कारण बरेचदा वरून भरलेला पालक दिसला तरी आतमध्ये पोकळ असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तपासून खरेदी करा. 

चांगला पालक कसा ओळखाल?

सौजन्य – Freepik

ताज्या पालकाची ओळख त्याच्या सुगंधाने अथवा त्याच्या पानावरून तुम्ही करू शकता. याच्या सुगंधावरून हा पालक ताजा आहे की जुना आहे याचा अंदाज लावू शकता. तसंच तुम्ही पालकाचे पान तोडून तुमच्या हातावर रंग लागला आहे की नाही हे तपासून पाहू शकता. जर तुमच्या हाताला पान तोडल्यानंतर रंग लागला तर हा पालक योग्य नाही हे समजते. यामध्ये रंगाचा वापर करण्यात आला आहे हेदेखील समजते. त्यामुळे ही ट्रीक तुम्ही वापरून पाहा.

हा लेख वाचल्यानंतर तुम्ही योग्य ट्रिक्सचा वापर करूनच पालक खरेदी कराल याची आम्हाला खात्री आहे. आपले आरोग्य राखणे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पालक तपासून मगच खरेदी करा. स्वस्थ खा मस्त राहा! 

Leave a Comment