दसऱ्यानंतर वेध लागतात ते वर्षातील सगळ्या मोठ्या सणाचे ते म्हणजे दिवाळीचे. यंदा दिवाळी 22 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2022 या काळात आहे. दिवाळीतील (Diwali 2022) सगळ्या दिवसांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्यातील ‘लक्ष्मीपूजन’ अनेक कार्यासाठी शुभ मानले जाते. असे तर अमावस्या हा दिवस कोणत्याही चांगल्या कार्यासाठी योग्य मानला जात नाही. पण लक्ष्मीपूजन अश्विन वद्य अमावस्येला येऊनही अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी- कुबेराची पूजा केली जाते. घरात धनासोबतच लक्ष्मीचा वास असावा यासाठी या दिवशी दोघांचीही पूजा केली जाते. नुसते धन असून चालत नाही तर त्यासोबत आयुष्यात शांती आणि समाधान टिकून राहणे गरजेचे असते म्हणूनच या दिवशी दोघांची पूजा करतात. आता लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) हे महत्वाचे आहे ते थोडक्यात कळलेच असेल पण या मागील पौराणिक कथा नेमकी काय ते घेऊयात जाणून. शिवाय लक्ष्मीपूजनाला काय करु नये ते देखील जाणून घ्या
लक्ष्मीपूजनाचे पौराणिक महत्व

पौराणिक साहित्यामध्ये लक्ष्मीमाता ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे. बळी नावाच्या राक्षसाने सगळ्या देवांना आपल्या कारागृहात बंद करुन ठेवले होते. इतर देवांना आणि आपल्या पत्नीला आणण्यासाठी त्यांनी बळी राक्षसाला हरवले. त्याच्या कारावासातून लक्ष्मी आणि इतर देवतांची सुटका केली. तो दिवस लक्ष्मीपूजनाचा दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मीची पूजा मनोभावे केली तर आपल्याकडे लक्ष्मी वास करते असे सांगितले जाते. मा जगदंबेच्या रुपात आधीच म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी (नवरात्रीत) देवी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर आलेली असते. शरदपौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथन झाले त्या समुद्रमंथनातून लक्ष्मी माता उत्पन्न झाली.
त्यामुळे दिवाळीतील लक्ष्मीपूजनासंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. पण या दिवशी लक्ष्मीमाताLaxmi Pujan आपल्याकडे राहावी यासाठी हा दिवस फार महत्वाचा मानला जातो.
अशी करा लक्ष्मीपूजा (Laxmi Pujan)
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या दिवशी अनेक जण नव्या वस्तूंची खरेदी करतात. यंदा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. सकाळी गोविंदा म्हणत कारेट फोडल्यानंतर लक्ष्मीची आराधना करण्यासाठी सायं. 6 वाजून 8 मिनिटांपासून ते 08 वाजून 38 पर्यंतचा शुभ मूहुर्त आहे. अमावस्या ही सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरु होणार आहे. त्यामुळे पूजाविधीचा काळ बघूनच तुम्हाला पूजा करावयाची आहे
- असे म्हणतात जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे लक्ष्मीच्या स्वागतानासाठी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी घर आणि घराचा परिसर स्वच्छ आणि सुगंधी करावा.
- घरात या दिवशी स्वच्छतेसाठी नवा झाडू आणला जातो. या झाडूचीही पूजा केली जाते. तिच्यावर थोडे पाणी घालून तिचा उपयोग करण्यास सुरुवात करावी
- एका पाटावर मूठभर तांदूळ ठेवून त्यावर एक वाटी किंवा पसरट प्लेट घेऊन त्यामध्ये सोने किंवा चांदी ठेवावे. घरी लक्ष्मी आणि कुबेराची फ्रेम असेल तर ती देखील ठेवावी. त्याला हळद कुंकू, फुलं, तांदूळ वाहून मनोभावे पूजा करावी.
- लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी मनात कोणताही अन्य विचार नसावा. मनोभावे आपल्या इच्छा तिच्यासमोर मांडाव्यात.घरातील सगळ्यांनी मिळून लक्ष्मीपूजन करावे.
आता यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजन करायला अजिबात विसरु नका.
अधिक वाचा
म्हणून संकष्ट चतुर्थीला आहे अनन्यसाधारण महत्व
काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स