Diwali 2022: लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्ताशांचाच प्रसाद का, जाणून घ्या

दिवाळीचा सण अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. दिवाळी हा तसं तर सर्वात मोठा सण मानला जातो. यावर्षी दिवाळी 26 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. 24 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे आणि दिवाळीचा दिवस हा 26 ऑक्टोबर आहे. लक्ष्मीपूजन करताना गणेश आणि लक्ष्मीपूजन (Laxmi Puja) करताना त्यासाठी लाह्या आणि बत्ताशाचा प्रसाद दाखविण्यात येतो. पण नक्की हाच प्रसाद का देवीला अर्पण करायचा याबाबत ही महत्त्वाची माहिती. 

दिवाळीसाठी गणेश आणि लक्ष्मीपूजा का करावी?

सौजन्य – Freepik

दिवाळीसाठी गणेश आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते. असं म्हटलं जातं की, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीचे पूजन केल्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद भक्तांवर कायम राहोत असा समज आहे. घरात यश, संपत्ती, वैभव टिकून राहण्यासाठी ही पूजा करण्यात येते. गणेश पूजन केल्याने सद्बुद्धी वाढते असं म्हटलं जातं. तर धन आणि ज्ञानाची प्राप्तीही होते. लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) केल्याने वर्षभर आपल्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान टिकून राहते आणि लक्ष्मीचा वास कायम राहातो असा समाज आहे. यावर्षी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त (Laxmi Pujan Puja Muhurat 2022) हा 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.53 ते 8.16 पर्यंत आहे. साधारण 1 तास 23 मिनिट्स या काळात तुम्ही लक्ष्मी पूजन करू शकता. 

लाह्या आणि बत्ताशे प्रसाद म्हणून का?

लाह्या (Kheel) या धान्यापासून बनवल्या जातात. त्यामुळे सर्वात शुद्ध मानले जाते. याच कारणामुळे लक्ष्मीपूजनासाठी या पवित्र आणि शुद्ध धान्याचा वापर केला जातो. देवी – देवतांना पूजेसाठी हिंदू धर्मात गोड पदार्थांचा नेवैद्य अर्पण करण्यात येतो. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि समजानुसार, दिवाळीच्या दिवशी गणेश आणि लक्ष्मी देवीसाठी पांढऱ्या पदार्थांचा नेवैद्य हा उत्तम आणि शुभ असल्याचे समजण्यात येते. तसंच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तांदळाच्या खीरीचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण तांदळाचा रंग पांढरा असल्यामुळे याचा प्रसाद उत्तम ठरतो आणि लक्ष्मी प्रसन्न होते असे मानण्यात येते. याच कारणामुळे लाह्या आणि बत्ताशांचा (Battashe) प्रसाद लक्ष्मीला अर्पण करण्यात येतो. यामुळे घरात धन आणि वैभव भरभरून येते आणि कायम टिकून राहाते. 

तसंच दिवाळीच्या पूर्वी तांदळाचे पीक तयार होते आणि त्याच नव्या पिकाचा भोग अर्थात नेवैद्य हा दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीला दाखविण्यात येतो असंही म्हणतात आणि याच कारणामुळे खीर, लाह्या आणि बत्ताशे याचा नेवैद्य अनेक ठिकाणी घराघरामध्ये दाखविण्यात येतो. 

ही माहिती तुम्हाला आवडली की नाही? अशाच तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी आम्ही आमच्या लेखांमधून तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला हे लेख आवडत असतील तर नक्की शेअर करा आणि आम्हाला dazzlemarathi.com वर फॉलो करा. 

Diwali 2022 : का आहे दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) महत्व

Diwali 2022: घरातील लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काढून टाका हे सामान

म्हणून संकष्ट चतुर्थीला आहे अनन्यसाधारण महत्व

Leave a Comment