Bigg Boss Marathi S4: अखेर बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे, प्रसादने केले अमृताला प्रपोज

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) चा चौथा सीझन आता हळूहळू रंगात येताना दिसत आहे. काही जणांना हा सीझन खूपच कंटाळवाणा वाटत आहे तर काही जणांना हा सीझन आवडत असून यावेळी प्रेक्षकांच्या मिक्स प्रतिक्रिया मिळत आहेत. मागच्या आठवड्यात त्रिशूल मराठे (Trishul Marathe) घराच्या बाहेर गेला. पण त्याआधी समृद्धी आणि त्रिशूल या दोघांनाही एकमेकांच्या नावाने चिडविण्यात येत होते. तर प्रसाद जवादे (Prasad Jawade), अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि अक्षय केळकर (Akshay Kelkar) या तिघांच्या प्रेमाचा त्रिकोण होतोय की काय अशीही शंका चाहत्यांना येत होती. पण आता अखेर असा प्रोमो प्रसारित करण्यात आला आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घरातही प्रेमाचे वारे वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

प्रसादने केले अमृताला प्रपोज, प्रोमो प्रसारित 

सध्या बिग बॉसच्या घरात कॉलेज कट्टा भरविण्यात आला आहे. तर कॅप्टन्सी कार्यासाठीही सध्या धडपड सुरू आहे. पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे प्रसादने अमृताला केलेल्या प्रपोजने. अनेक दिवस या क्षणाची त्यांचे चाहते वाट पाहत होते. पहिल्या आठवड्यापासूनच अमृताच्या मनात प्रसादविषयी सॉफ्ट कॉर्नर असल्याचे दिसून आले आहे. तर अक्षयबरोबरील अमृताची मैत्री प्रसादला आवडत नसल्याचेही त्याच्या वागण्यावरून दिसून आले आहे. त्यामुळे प्रसादच्या मनातही अमृताविषयी प्रेम असेलच असे प्रेक्षकांनी ठरवून टाकले होते. आज प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये प्रसाद अमृताला प्रपोज करताना दिसून येत आहे. बिग बॉसच्या घरात सिनिअर आणि ज्युनिअर असे दोन गट सध्या टास्कमध्ये करण्यात आले आहेत. कॉलेज कट्ट्यावर अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) आणि स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) या दोघी प्रसादचे रॅगिंग करत असून अपूर्वा त्याला त्वरीत अमृताला प्रपोज कर असे सांगण्यात आले आहे. पण त्यानंतर प्रसादने ज्या प्रेमाने आणि रोमँटिक अंदाजात अमृताला विचारले त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटत असल्याचे दिसून आले आहे. तर यामुळे अमृताही खूपच लाजताना दिसून येत आहे. 

खरं तर हे सर्व गमतीत चालू झालं असलं तरीही आता हे खरं होणार का? अमृता आणि प्रसाद एकत्र येणार का? असेही प्रश्न आता चाहत्यांना सतावू लागले आहेत. 

प्रसादबाबत द्विधा मनस्थिती 

प्रसादबाबत घरात अमृता सोडता कोणाचेही चांगले मत नाही. खेळात जरी प्रसाद गोंधळलेला असला तरीही प्रसाद ज्या टीमसह खेळतो तिथे आपले संपूर्ण 100 % योगदान देतो. मात्र चुकीच्या वेळी चुकीचे बोलून प्रसाद नेहमीच खेळात चुकीचा ठरताना दिसत आहे. गोंधळलेला आहे हे दाखवणं हीच प्रसादची स्ट्रॅटेजी तर नाही ना? असेही अनेकांना वाटत आहे. पण पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये प्रसाद दिसेल असेच प्रेक्षकांना वाटत आहे. सर्वात जास्त चर्चा ही सध्या प्रसाद जवादेची होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढचा खेळ नक्की कशा वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Leave a Comment