धक्कादायक: अर्चना गौतम शिव ठाकरेविरुद्ध शारीरिक हिंसा केल्याबद्दल बिग बॉस 16 मधून बाहेर

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मधील सर्वात धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. या आठवड्यात अब्दु रोझिकला (Abdu Rozik) अर्चना गौतमने खूपच टार्गेट केले होते. त्यामुळे अब्दु आणि त्याचा जवळचा मित्र असणारा शिव ठाकरे (Shiv Thakare) दोघेही नाराज होते. पण आता अर्चनाला शिव ठाकरेविरूद्ध शारीरिक हिंसा केल्याबद्दल बाहेर काढण्यात आल्याचे समजत आहे. अर्चना गौतम (Archana Gautam), जी बिग बॉसच्या घरात नेहमीच आक्रमक होण्यासाठी ओळखली जात होती, तिला शिव ठाकरे विरुद्ध शारीरिकदृष्ट्या हिंसा केल्याबद्दल शोमधून काढून टाकण्यात आले आहे असे आता समोर येत आहे. बातमी उघडकीस आल्यानंतर लगेचच, अर्चना गौतमच्या अयोग्य वर्तनाबद्दल काही धक्कादायक घटना समोर येण्यासाठी आम्ही जवळच्या स्त्रोताशी संपर्क साधला. त्यावर ही बातमी खरी असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

नक्की काय घडले

“उत्तेजित स्वभावासाठी ओळखल्या जाणार्‍या अर्चना गौतमने शिव ठाकरे यांना वारंवार धक्काबुक्की केली आणि नॅशनल टेलिव्हिजनवर त्याच्याशी अयोग्य आणि दुर्भावनापूर्ण गोष्टी बोलण्यापर्यंत मजल मारली. यावर शिव ठाकरेने चिडून प्रत्युत्तर दिले. या गोष्टीटा राग येऊन पुढे, क्षणात अर्चनाने शिव ठाकरेला मारण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर झटका दिला ज्यामुळे त्यांच्या मानेवर जखमा आल्या”, असे स्रोताकडून कळले. तर, स्त्रोताकडून सांगण्यात आले की, “निर्मात्यांनी स्वतः फुटेज पाहिले आणि अर्चनाला तिच्या हिंसक कृत्यांसाठी गेममधून काढून टाकण्याचा उचित निर्णय घेतला आहे” शोमध्ये अर्चना हिंसक झाल्याची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांनी हिंसक हल्ल्यांना तोंड देत शांतपणे परिस्थिती हाताळणाऱ्या त्यांच्या हिरो शिव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

शिव ठाकरेचे चाहते संतापले 

शिव ठाकरे पहिल्या आठवड्यापासून बिग बॉसमध्ये अत्यंत चांगला खेळत आहे. केवळ प्रेक्षकच नाही तर सेलिब्रिटीही पाठिंबा देत आहेत. त्याशिवाय शिवचे वनलाईनर्स (One Liners) देखील चाहत्यांना खूपच आवडते. मराठी बिग बॉसचा विजेता टिकेल की नाही अशी काही जणांना शंका होती. मात्र शिवने आपल्या खेळाने हिंदी प्रेक्षकांनाही आपलंसं करून घेतलं आहे. त्यामुळे पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये शिवचे नाव नक्की असणार अशी सर्वांना खात्री झाली आहे. गेले काही दिवस अर्चना आणि शिवमध्ये शाब्दिक बाचाबाची चालू होती. मात्र अर्चना अशा पद्धतीने वागेल असे कोणालाही वाटले नव्हते. याआधीही नियंत्रणात न राहिलेल्या स्पर्धकांना स्पर्धेच्या बाहेर काढण्यात आले होते. तर आता अर्चनालादेखील खेळाच्या बाहेर काढण्यात आल्याने प्रेक्षक खूष झाले आहेत. तसंच शिवबरोबर अर्चनाचे वागणे योग्य नसल्याने शिवचे चाहतेही प्रचंड संतापले आहेत. अर्चनाचे वागणे योग्य नसून तिला योग्य ती शिक्षा व्हायला हवी असंही आता सोशल मीडियावर चर्चा करण्यात येत आहे. 

Leave a Comment