Bigg Boss मराठी : खेळात शून्य पण तरीही रुचिरा जाधव का होतेय सतत सेफ

Bigg Boss मराठीचा खेळ दिवसेंदिवस अधिक रोमांचकारी होऊ लागला आहे. आतापर्यंत या घरात 4 नॉमिनेशन झाले आहेत. त्रिशुल मराठे शेवटच्या आठवड्यात बाहेर पडला. त्या आधी योगेश जाधव(Yogesh Jadhav), मेघा घाडगे(Megha Ghadge), निखिल राजेशिर्के (Nikhil Rajeshirke) हे बाहेर पडले आहेत. आता पाचव्या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडेल? याची चर्चा होऊ लागली आहे. यात घरातील सदस्य आणि अभिनेत्री रुचिरा जाधव ही टार्गेटवर असलेली दिसत आहे. पाच आठवडे घरात राहूनही उत्तम कामगिरी न केलेल्या रुचिराहून अधिक चांगले खेळाडू घरातून बाहेर पडले आहेत. यात मेघा घाडगे आणि योगेश जाधव यांच्या नावाचा उल्लेख अगदी आवर्जून करावासा वाटतो. असे असतानाही रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) का सेफ होतेय असा प्रश्न नेटीझन्सना पडू लागला आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन पाहता रुचिरा जाधव ही सदस्य घराबाहेर जाणे योग्य आहे असे अनेकांचे मत आहे. दरम्यान अशी मत येण्यासाठी नेमके घडले काय चला घेऊया जाणून 

 कोणत्याही खेळात उत्तम कामगिरी नाही

Bigg Boss चे घर म्हटल्यावर येथे टास्क आले. साम- दाम-दंड असे म्हणत खेळ खेळावे लागतात. अनेकदा टास्क बुद्धीमत्तेसोबत खेळण्यासारखेही असतात. अशावेळी जो कामगिरी दाखवतो तो सदस्य हा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. आल्यादिवसापासून घरात जे काही टास्क झाले आहेत त्यामध्ये रुचिरा जाधव ही कुठेही खेळताना दिसली नाही. तिचा खेळ हा फिल्डवर तर दिसत नाहीच शिवाय तिची मतही आता घरातील सगळ्यांना पटत नाही असे दिसून येत आहे. सामंजस्य या गुणावर या खेळात अधिक काळ टिकता येऊ शकत नाही. त्यामुळेच रुचिरा आता घरातील इतर सदस्यांसाठीही फायद्याची ठरताना दिसत नाही. घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क झाला त्या टास्कमध्येही ती फार काही खेळताना दिसली नाही. पण असे असूनही ती काही आठवडे या घरात नॉमिनेशनपासून वाचून राहिली आहे. पण या पुढे तिला या घऱात टिकता येईल असे काही दिसत नाही. कारण रुचिराचा खेळ ( शांत राहून पुढे जाण्याचा ) हा अनेकांच्या लक्षात येऊ लागला आहे. शिवाय घरात काल झालेल्या टास्कमध्येही हरल्यानंतर तिचे जे काही रुप दिसून आले त्यानंतर तिने हे रुप दाखवण्यापेक्षा खेळाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 

रोहितला खेळ प्रिय

खरंतरं रुचिरामुळे रोहित शिंदेचा खेळ वाया जातोय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अजूनही एकमेकांना पुढे करण्याच्या नादात त्यांचा खेळ वाया जाताना दिसतो. पण बुधवारी झालेल्या टास्कमध्ये कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवून त्याने आपला खेळ दाखवला आहे. त्यामुळे मंदावलेल्या रोहितने टास्कमध्ये आपली कंबर कसली असे म्हणावे लागेल. त्याने त्याचा खेळ खेळणं आता फारचं जास्त गरजेचं आहे. रुचिरा या खेळात जिंकण्यासाठी आली आहे असे कुठूनही दिसत नाही. तिच्या खेळात स्पार्क नसल्यामुळेच ती खेळासाठी योग्य नाही असे अनेकांना वाटते. 

चुकीच्या वेळी होते अशांत

रुचिरा टास्कमध्ये बाद झाल्यानंतर स्वत:ची चुकी फारच कमी वेळा मानताना दिसते. ती खेळातून बाहेर पडल्यानंतर तिला काही मत कायम मांडायची असतात. जी अनेकदा चुकीची असतात. कालच्या खेळातही ती बाद झाल्यानंतर तिने नको तो राडा घातला.  ज्या टीममधून रुचिरा खेळते ती टिम कायम चुका करते त्यावेळी ती गप्प असते. पण काल तिचे तिकीट बाद झाल्यानंतर तिने घातलेले वाद हा फुटेज पलीकडे काहीही नव्हता हे अनेकांच्या लक्षात आले आहे 

खेळात कोणतीही कामगिरी दाखवलेली नसताना केवळ वोट्समुळे ती या घरात असलेली अनेकांना पटत नाही हे व्हिडिओ खालील कमेंट्स नक्कीच सांगतात.

Leave a Comment