Bigg Boss 16 : शिवच्या ‘त्या’ कपड्यावरुन विकासच्या बायकोने केले गंभीर आरोप

Bigg boss च्या घरातील एका वेगळ्याच किस्स्याने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिग बॉसच्या इतिहासात असा आरोप आतापर्यंत कोणावरही लावला नसेल याचे कारण या घरात इतके कॅमेरे आहेत की, त्यातून काहीही चुकू शकत नाही. अशातच शिव ठाकरे (Shiv Thakre) ने घातलेल्या एका कपड्यावरुन विकासच्या बायकोने त्याच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. कोणतीही माहिती न घेता केवळ विकासचा राग म्हणून तिच्या बायकोने शिव ठाकरेवर कपडे चोरून घालण्याचा आरोप केला आहे. त्यावर शिव ठाकरे (shiv Thakre) च्या टीमने न बोलणेच पसंत केले आहे. त्याने एक पोस्ट करुन याचे उत्तम दिले आहे. दरम्यान हा गोंधळ काय? चला घेऊया जाणून 

शिव कपडे चोर- गुंजन मानकतला

खरंतरं या सगळ्याची सुरुवात विकास मनकतला (vikas manaktla) घरातून बाहेर गेल्यापासून सुरु झाली आहे. वीकेंडच्या वारच्या वेळी शिवने एक आकाशी रंगाचा फुलांचा ब्लेझर घातला होता. तो ब्लेझर त्याने अवघ्या काहीच वेळात काढून टाकला आणि दुसरा अटायर केला. ते पाहिल्यानंतर विकासच्या बायकोने हे विकासचे कपडे असल्याचे ट्विटरवरुन सांगितले. शिवने विकासचे कपडे चोरुन घातले असा थेट आरोपच तिने ट्विटरवरुन केला. त्यामुळे झाले असे की, शिवच्या मॅनेजरने या संदर्भात चॅनेलशी विचारणा करा असे सांगितले. त्यानंतर आरोप करा. गुंजनला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने तातडीने तिचे ट्विट डिलीट केले. पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शिवच्या कुटुंबियांच्या भावनाही दुखावल्या गेल्या. विकासने खेळात असताना शिवसंदर्भात कोणतीही माहिती नसताना मराठी बिग बॉसमधील एक गोष्ट रंगवून सांगितली होती. त्यावेळीही बिग बॉसने त्याला रोखले होते. पण त्याने घराबाहेर येऊनही शिववर आरोप करण्याचे काही सोडलेले नाही. अर्थातच शिवची प्रतिमा खराब करण्यासाठी तिने हे ट्विट केले असावे असे शिवच्या चाहत्यांना वाटत आहे. 

विकासचा तो ब्लेझर तिला टीमकडून परत आल्यानंतर तिने तो पोस्ट करत हे कपडे परत आल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तिने झालेल्या चुका आवरण्याचा प्रयत्न केला आहे. 

शिवकडे बेस्ट डिझायनर

शिव या घरात आल्या दिवसापासून स्टायलिश राहात आहे. शिव कडून यासंदर्भात कोणतीही गोष्ट समोर येत नसल्यामुळे चाहते त्या गोष्टीची वाट पाहात होते. पण शिवच्या कुटुंबाकडून काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार शिवचे आधीच 3 डिझायनर आहेत. ते त्याला प्रत्येक दिवशी सुंदर दिसण्यासाठी काम करतात. त्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. तो कोणाच्याही गोष्टी वापरु शकत नाही. आधी शिवबद्दल चुकीची माहिती देऊन विकासने शिवशी पंगा घेतला. त्याचा परिणाम तो या खेळातून बाहेरही झाला. आता तिच्या पत्नीच्या या स्टेटमेंट आणि टिवटिवाटामुळे त्याच्या कुटुंबियांना नाहक त्रास झाला. या गोष्टीचा छडा लावल्यानंतर शिवचे कुटुंब पुढचे पाऊल उचलणार असल्याचे कळत आहे. 

दरम्यान विकास आणि तिच्या बायकोच्या या उथळपणाचा त्रास नक्कीच विकासला भोगावा लागेल असे दिसत आहे. तुम्हाला यात कोणाची चुकी वाटते ते आम्हाला नक्की कळवा. 

Leave a Comment