‘असा ये ना गाणं’ प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी संगीत क्षेत्रातही हल्ली नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. मराठी सिंगल्सच्या काळात अनेक गाणी येताना दिसत आहेत. असे एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘असा ये ना…’ हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. एका अनोख्या प्रेमकथेचा अनुभवही यामध्ये प्रेक्षकांना येणार आहे. धरणी प्रोडक्शनच्या बॅनरखाली हे गाणे असून गायक रोहित राऊत आणि नेहा राजपाल यांनी हे गाणं गायले आहे. हिंदी गाण्याप्रमाणेच हे गाणे तुम्हाला ताल धरायला लावेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चला जाणून घेऊया या गाण्याविषयी अधिक 

प्रत्येक सैनिक पत्नींसाठी

या गाण्याचे पोस्टर पाहिल्यानंतर अंदाज आलाच असेल की हे गाणं सैनिकांच्या जीवनावर अवलंबून आहे. देशाचे संरक्षण करणारे सैनिक आपल्या कुटुंबाला मागे टाकून आपली जबाबदारी पार पाडत असतात. अशावेळी त्यांच्या पत्नी आणि त्यांच्यामधील विरहाची कहाणी सांगणारे असे हे गाणे आहे. या गाण्यात कोणतीही वाईट घटना नाही तर निव्वळ प्रेम दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे एक प्रेमगीत असून ते जरी सैनिकांच्या आयुष्यात शूट करण्यात आले असले तरी हे गाणे नुसते ऐकले तर ते गाणे प्रत्येकासाठी आहे. असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

धरणी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अहमदाबादची असून त्यांनी सर्वप्रथम मराठी गाण्याची निर्मिती करायचं ठरवलं. धरणी प्रोडक्शन बॅनरखाली तयार झालेलं पहिलं गाणं म्हणजे ‘असा ये ना…’ या गाण्याच्या निर्मात्या सुनीता नायक या अहमदाबादच्या रहिवासी आहेत. चित्रपटक्षेत्राची खूप आवड असल्यामुळे त्यांनी मराठीमध्येच काम करायचं ठरवलं. प्रत्येक उत्सवाला एक गाणं स्वतःच्या यूट्यूब चॅनल वर रिलीज करायचं आणि नवीन टॅलेंटला प्रोत्साहन द्यायचं हा निर्मात्या सुनीता नायक यांचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे आता या गाण्यानंतर त्यांचे पुढील गाणं कोणतं असेल ते पाहावे लागेल

.

Leave a Comment