झोपेत तुम्ही हसता किंवा बोलता….

 झोप ही सगळ्यांनाच प्रिय असते. पृथ्वीतलावर झोप न घेणारा मनुष्य विरळाच असेल. अशा या झोपेबाबतीत तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. झोप कशी असावी? झोपताना नेमके कसे झोपावे? किंवा मग स्वप्नरंजनातील काही गोष्टी या देखील तुम्ही या पूर्वी वाचल्या असतील. एकदा का डोळा लागला आणि आपण गाढ झोपलो की, आपण काय करतो याचे भानही आपल्याला राहात नाही. कारण निद्रेत गेल्यानंतर आपली सगळी इंद्रिये ही त्यावेळापुरती काम करणे थांबवतात. शरीर आणि मन दोन्हीही एकदम शांत झाल्यामुळे साहजिकच आपल्याला बरे वाटते. पण या शांत झोपेतही अनेकांना बोलण्याची, हसण्याची, रडण्याची आणि काही भावना व्यक्त करण्याची सवय असते. खूप जणांना तुम्ही असे करतानाही पाहिले असेल. अगदी लहान मुलं अनेकदा दिवसभर जे काही करतात ते सगळे झोपेत बरळून मोकळे होतात. दुसऱ्या दिवशी किंवा त्याक्षणी जरी त्यांना उठवून विचारलं तरी देखील त्यांना त्यासंदर्भात काहीही आठवत नाही. पण झोपेत तुमच्या बोलण्या आणि हसण्यामागे काही कारणं असतात असे सांगितले जातात. जाणून घेऊया या विषयी अधिक 

झोपेत बोलण्याची सवय

झोपेत बोलण्याची सवय ही अनेकांना असते. पण हा काही खूप चिंतेचा विषय असेल असे आपल्याला वाटत नाही. पण अनेक प्रयोगांती असे निदर्शनास आले आहे की, ज्या व्यक्ती झोपेत बोलतात. त्यांना काही त्रास असण्याची संभावना असते. झोपेत बोलण्याची सवय ही चिंता, निद्रानाश, ताण तणाव, मद्यपानाचे परिणाम या कारणामुळे देखील झोपेत बोलण्याची ही सवय लागू शकते. झोपेत बोलण्याची ही सवय तुम्ही योग्य वेळी सोडायला हवी. यासाठी तुम्ही झोपेचे गणित पाळा. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली झोप तुम्ही घेत आहात की नाही हे पाहा. शरीराला आवश्यक असलेली झोप पूर्ण झाली नाही की, त्यामुळे अशी सवय लागण्याची शक्यता असते.  

जर तुमच्यावर एखादा ताण ( Tension) असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक उदाहरणांमध्ये एखाद्या गोष्टीचा अति ताण हा तुमच्या झोपेवर परिणाम करतो आणि सर्वार्थाने तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असतो. त्यामुळे जर ही सवय वाढत असेल तर ताण तणावातून बाहेर या. तरच तुम्हाला आराम मिळू शकेल.

झोपेत हसणे किंवा रडणे

झोपेत रडण्याची किंवा हसण्याची सवय

आता बोलण्यापर्यंत ठिक पण झोपेत कोण बोलतं आणि हसतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही हे नक्की वाचायला हवे. खूप जणांना झोपेत हसण्याची किंवा मध्येच रडण्याची देखील सवय असते. असे म्हणतात की, मनुष्य एखाद्या गाढ स्वप्नात असेल आणि अचानक त्याच्यासोबत काही चांगले वाईट घडले की, त्यानुसार तो प्रतिक्रिया देत असतो. जी व्यक्ती हे करते त्याला विचारल्यानंतर त्याला यातले काहीही माहीत नसल्यामुळे त्याला त्या संदर्भात काहीही आठवणार नाही. पण जर झोपेत हसणे आणि रडणे हे सततचे होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आनंद झाला तर आपण हसतो हे साहजिक आहे. पण असे म्हणतात की हसणे किंवा घाबरुन रडणे या दोन्हीही गोष्टी तशा चांगल्या नाहीत. आपल्या भावनांना व्यक्त करण्याचा स्वप्न रंगवणे हा मार्ग असला तरी देखील अशा झोपेत आपण अचानक हसण्यामुळे किंवा रडण्यामुळे समोरच्याचा गोंधळ होऊ शकतो. अशावेळी झोपण्यापूर्वी चांगले वाचा. चांगले बोला आणि चांगले विचार मनात ठेवून झोपा. त्यामुळे हा त्रास होणार नाही. 

 आता जर एखाद्याला अशी सवय लागली असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच योग्य काळजी घेण्यास सुरुवात करा. 

Leave a Comment