त्याच्या एका शब्दावर चक्क बाप्पा घ्यायला आला…

गणपती बाप्पाचा (Ganpati Bappa) भक्त नाही असा माणूस विरळाच. बाप्पाच्या असण्याने आयुष्यात एक सकारात्मकता भरून राहते असे अनेकांना वाटते. तसंच बाप्पावर मनापासून विश्वास ठेवणारेही  अनेक भक्त आहेत. असाच एक भक्त म्हणजे सर्वांचा आवडता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade). संकर्षण सध्या मालिका आणि नाटकांचे प्रयोग यामध्ये व्यग्र आहे. अनेक ठिकाणी सध्या संकर्षणचे नाटकाचे प्रयोग चालू आहेत, त्यामुळे त्याला सध्या झोपेसाठीही वेळ मिळत नाहीये. मात्र संकर्षणने आपला एक अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे. या अनुभवानंतर अनेकांनी त्याच्या या मांडणीला दुजोरा दिला आहे. 

काय व्यक्त झाला संकर्षण 

संकर्षण सध्या नाटकाच्या दौऱ्यावर आहे. त्याने आपला बाप्पाबाबतचा अनुभव मीडियावर व्यक्त केला आहे. संकर्षण हा अत्यंत संवेदनशील अभिनेता तर आहेच. पण उत्तम लेखक आणि कवीदेखील आहे. त्याने आपला अनुभव अत्यंत सुंदर शब्दात मांडला आहे. 

“बाबा , काळजी करु नका.. गणपती मला स्वत: घ्यायला येईल ..” 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

(माझा हा अनुभव PLEASE नक्की वाचा.. )

मी परवा मुंबईहुन नाटकाच्या कोकण दौऱ्यासाठी निघतांना घरात सहज म्हणालो कि , रत्नागीरीहून २.३० तासावर गणपतीपुळे आहे.. दर्शनाला जाउन येइन. तेंव्हा बाबा काळजीने म्हणाले कि ,

का धावपळ करतोस..? वेळ मिळालाय तर दिवसभर आराम कर.. त्यात तू जाणार कसा ..? प्रवासाचं काय नियोजन ..?

हे विचारल्यावर मी अगदी सहज थाटात म्हणालो कि ,

“बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल ..” आणि घरुन निघालो…..

काल रात्री रत्नागीरीच्या प्रयोगाला गणपतीपुळे देवस्थान चे पुजारी श्री. उमेश घनवटकर प्रसादाचे उकडीचे मोदक घेउन आले.. मला म्हणाले चला दर्शनाला गाडी घेउनच आलोय.. मी म्हणालो पण माझं काही तशी तयारी नाहीये.. शिवाय आमची राहायची सोय चिपळून ला आहे .. तेंव्हा ते म्हणाले रहायची , दर्शनाची , जेवणाची सगळी सोय , नियोजन मी करतो.. तुम्ही फक्तं गाडीत बसा आणि चला .. मला माझंच स्वत:चं वाक्यं आठवलं “बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल ..” .. मी रत्नागीरीच्या प्रयोगानंतर त्यांच्या गाडीत बसलो तर अर्थातच समोर गणरायाचा छानसा फोटो .. 🙏🏻 काल मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो .. राहाण्याची उत्तम सोय त्यांनीच कोली.. आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं .. दर्शनाला घेउन गेले .. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला.. आणि मनसोक्तं खायला घातलं ..

मी तुम्हाला कसा सांगु ह्या प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि हे सगळं गणपती मी उच्चारलेल्या त्या एका वाक्यासाठी माझ्याकडून करवून घेतोय.. 🥺🙏🏻

माझी आई मला माझ्या लहानपणापासून सांगत आलीये कि , “बोलतांना कायम चांगलं बोलावं .. “ मी उच्चारलेल्या त्या एका चांगल्या वाक्यासाठी गणपती बाप्पा ने माझ्यासाठी काय काय केलं .. 🙏🏻

मी खूप भाराऊन गेलोय.. बाप्पा मोरया .. 🤗🤗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

संकर्षणचा हा अनुभव वाचून अनेक सेलिब्रिटींना बाप्पावरील आपली श्रद्धाही बोलून दाखवली आहे. यामध्ये कुठेही देखावा नाही आणि अंधश्रद्धाही नाही. अत्यंत भावनात्मकरित्या संकर्षणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Leave a Comment