नवरदेवासाठी हटके उखाणे (Navrayasathi Ukhane In Marathi)

 सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. लग्नातील धामधुमीत ओठांवर हसू आणणारे उखाणे हे तितकेच हवेहवेसे असतात. उखाणे घेण्याचा हट्ट हा केवळ नववधूला केले जात नाही. तर नवरदेवाला देखील लग्नानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये उखाणा घेण्याची वेळ येते. या आधी आपण नववधूसाठी उखाणे पाहिले आहेत. पण नवरदेवांना मागे ठेवून कसे चालेल नाही का? म्हणूनच खास नवरदेवासाठी आम्ही खास उखाणे शोधून काढले आहेत. हे उखाणे होणाऱ्या नवरदेवासोबत तुम्ही नक्की शेअर करायला हवे. (Navryasathi Ukhane)

नवरदेवासाठी 25 बेस्ट उखाणे

नवरदेवाला थोडे हटके उखाणे घ्यायचे असतील त्यासाठी आम्ही असे खास उखाणे शोधून काढले आहेत. हे उखाणे तुम्ही नक्की घ्या.

  • तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी
    बघता क्षणी प्रेमात पडलो ______ची लाल ओढणी
  •  हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू
    मी आहे लंबू आणि ____ किती टिंगू  
  •  चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ
    ______ नाव घेतो कारण पुढचं नाही पाठ
  •  रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे छसे
    _____ चे रुप पाहून चंद्र सूर्य ही हासे
  •  5 +4 = 9, _____ युआर माईन
  •  ____ च्या मैदानात खेळत होतो क्रिकेट
    _____ ला पाहून पडली माझी विकेट
  •  श्रावणात पडतो प्राजक्तांचा सडा
    ____ आवडतो बटाटवडा
  •  स्टुलावर स्टुल 32 स्टुल
    ____ आमची एकदम ब्युटी फुल
  •  सगळ्यांनी राखावा मराठी भाषेचा मान
    ______ चं नाव घेतो ऐका लक्ष देऊन कान
  • काश्मिरच्या नंदनवनात मिळतो निशिगंध
    ______ सोबत मला मिळतो सर्वानंद 
  • नंदनवनात अमृताचा कलश
    ___ आहे माझी भारी सालस
  •  गोड गोड पुरणपोळीवर घ्यावे भरपूर तूप
    ____ वर आहे माझे प्रेम खूप खूप खूप
  •  ____माझी माता ____ माझा पिता
    _____ च्या मुर्हूतावर ____ आणली कांता 
  • हत्तीच्या अंबारीला मखमली झुल
    ____ आहे आमचे नाजूक गुलाबाचे फुल
  •  जाईच्या वेलीला चांदीची तार
    _____ आहे म्हणजे माझी लाखात सुंदर नार
  • चंद्र आहे रोहिणीच्या सोबती
    ____ झाली माझी जीवनसाथी
  •  सत्यनारायणाची पूजा जोडीने केली
    _____ चं नाव घ्यायला घाई-घाई झाली
  • श्रावण महिन्यात असतात खूप सण
    _____ सुखी ठेवीन हा आहे माझा पण
  •  कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात
    _____ चं नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात
  • वेरुळची शिल्पे आहेत खूपच सुंदर
    ____आहे माझी त्याहून सुंदर  

नक्कीच शेअर करा हे बेस्ट उखाणे

Leave a Comment