या कारणामुळे सुनील शेट्टीचं (Suniel Shetty) होतंय कौतुक

 आपल्या आवडीच्या कलाकाराला भेटल्यानंतर त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा चाहत्यांना असते. पण हल्लीचे कलाकार त्यांच्या चाहत्यांशी फारसे बोलताना दिसत नाही किंवा जरा घाबरुनच ते त्यांच्या चाहत्यांसोबत बोलताना दिसतात. पण याला अपवाद ठरला आहे तो म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) आपल्या चाहत्यांसोबत तो केवळ फोटो देतानाच नाही तर गप्पा मारताना तो स्पॉट झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमुळे सगळीकडे सुनील शेट्टीचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहे. सुनील शेट्टी गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर असला तरी देखील तो काही ना काही चांगल्या कारणामुळे कायम स्पॉट लाईटमध्ये असतो.

चाहत्याला दिला वेळ

बरेचदा सेलिब्रिटी एअरपोर्टवर दिसतात. त्यावेळी त्यांना पाहून फोटो काढण्यासाठी अनेक जण रांगा लावतात. सेलिब्रिटींचा मूड चांगला असेल तर अशावेळी सेल्फी मिळून जाते. पण जर काही कारणास्तव सुरक्षा अधिक असली तर फोटो मिळणे दूरच असते. बरेचदा सेलिब्रिटीही फोटो देण्यास नकार देतात. अशावेळी त्यांच्या त्या उद्धट वागण्यामुळे ते ट्रोलही होतात. पण सुनील शेट्टीच्या बाबतीत असे कधीही झालेले दिसले नाही. झाले  असे की, सुनील शेट्टी विमानतळावरुन बाहेर येत असताना त्याला अनेक चाहत्यांनी पाहिले. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी एका लहान मुलाच्या वडिलांनी धाव घेतली. सुरक्षा रक्षक त्याला मागे हटण्यासाठी सांगत होते. पण सुनील शेट्टीने लहान मुलाला पाहिले आणि त्याने लगेचच त्याला उचलून कडेवर घेतले. इतकेच नाही तर त्या लहान मुलाला घेऊन तो काही वेळ चालत खेळत ही होता. सुनील शेट्टीच्या कडेवर ते मुलं आनंदी होते हे दिसत होते. कारण त्या लहान मुलानेही अनोळखी व्यक्तीसोबत आपला वेळ चांगला घालवला होता. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी सुनील शेट्टीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

कॉन्ट्राव्हर्सीज पाहून कायम दूर

सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा तसा कोणत्याही कॉन्ट्राव्हर्सीजपासून कायम दूर आहे. आता तो फारसा चित्रपटांमध्ये काम करत नाही. पण तरीही त्याची प्रसिद्धी चांगली टिकून आहे. एका नव्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धारावी बँक’  नावाच्या सिरिजमध्ये तो आपल्या भेटीला येणार आहे. याचा ट्रेलर आणि लुक सुनीलने आधीच आपल्यासोबत शेअर केला आहे. त्याचे बॉलिवूडशी फारसे संबंध नसले तरी देखील तो वेगवेगळ्या ठिकाणी आपले नशीब आजमावताना दिसत आहे. त्याने वेगवेगळ्या सीरिज करायला घेतल्या आहेत हे त्याच्या प्रोफाईलवरुन दिसून येत आहे. 

मुलांवर प्रेम

सुनील शेट्टी हा फॅमिली मॅन आहे. तो फारच कमी पार्टीजमध्ये दिसून येतो. तो अनेकदा बाहेर जाताना आपल्या कुटुंबासोबत असतो.त्याच्यासोबत त्याची पत्नी ही कायम असते. मुलगी अथिया आणि मुलगा आहानसोबत तो कायम दिसतो. त्याच्यासोबत त्याचे अनेक फोटो दिसतात. मुलांच्या सोशल अकाऊंटवरही सुनील शेट्टी कायम असतो. त्यामुळेच तो फॅमिली मॅन आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

दरम्यान सुनील शेट्टीचा हा व्हिडिओ पाहून तु्म्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा.  

Leave a Comment