Tulsi Vivah 2022: तुळशी विवाह शुभ मुहूर्त, तिथी आणि इंत्यभूत पूजा विधी

तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यात शुक्ल पक्ष द्वादशीला साजरा करण्यात येतो (Tulsi Vivah 2022 Muhurt). आदल्या दिवशी देवउठनी एकदशी साजरी करण्यात येते. एकदशीच्या दिवशी भगवान विष्णू हे चार महिन्याच्या अर्थात चतुर्मासानंतर योगनिद्रेतून जागे होतात (Tulsi Vivah 2022 Date and Timing) असा समज आहे. आषाढी अर्थात देवशयनी एकादशीच्या दिवशी सुरू झालेला चतुर्मास देवउठनी एकादशीला संपतो. हिंदू धर्मानुसार, तुळशी विवाहानंतर शुभ कार्य आणि लग्नाच्या मुहूर्तांना सुरूवात होते. तसंच तुळशीच्या लग्नालाही आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशी विवाह यावर्षी किती तारखेला आहे आणि शुभ मुहूर्त आणि तुळशीच्या लग्नाचे विधी काय आहेत याबाबत अधिक माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. 

तुळशी विवाह शुभ मुहूर्त आणि तिथी (Tulsi Vivah 2022 Date and Tulsi Vivah Shubh Muhurt)

Instagram

यावर्षी तुळशीचे लग्न हे 5 नोव्हेंबर, 2022 रोजी संध्याकाळी 6.08 वाजता सुरू होऊन 6 नोव्हेंबर, 2022 रोजी संध्याकाळी 5.06 वाजता संपेल. अर्थात शनिवार,  5 नोव्हेंबर, 2022 रोजी संपूर्ण संंध्याकाळ तुळशी विवाह करता येईल. तसंच या दिवशी सकाळी 9.20 ते 10.42 हा राहूकाळ असणार आहे. त्यामुळे हा काळ वगळता संपूर्ण दिवस हा तुळशीच्या लग्नासाठीचा शुभ दिवस मानण्यात येत आहे. 

तुळशी विवाह पूजा विधी (Tulsi Vivah 2022 Puja Vidhi)

Freepik.com

ऑगस्ट महिन्यापासून हिंदू धर्मात जी सणांना सुरूवात होते ती साधारण तुळशीच्या लग्नापर्यंत सुरूच असते. तुळशीच्या लग्नाला हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे. आजही अनेक गावांमध्ये तुळशीच्या लग्नाची परंपरा जपली गेली आहे. तर शहरातही अनेक ठिकाणी घरांमध्ये तुळशीचे लग्न लावण्यात येते. पती पत्नीने एकत्रित तुळशीचे लग्न लावले तर त्यांच्या संसारात त्यांना नेहमी सुख समाधान मिळते असा समज आहे. तुळशी विवाह पूजा विधी नक्की कसे करावेत घ्या जाणून – 

  • सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत. तसंच काळ्या कपड्यांचे परिधान करू नये ही गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवा
  • घरातील यजमान (तुळशी विवाहात सहभागी होणारे) यांनी शक्यतो उपवास करावा आणि या व्रताचे सर्व नियम पाळावे 
  • तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त असेल तेव्हा तुळशीच्या रोपट्याजवळ वा तुळशीजवळ जाऊन ऊस रूतवावा आणि त्यावर लाल रंगाच्या ओढणीने मंडप सजवावा. तसंच तुमच्याकडे शाळीग्राम असेल तर तो तुळशीमध्ये ठेवावा. कारण तुळशीचा विवाह हा शाळीग्रामशी लावण्यात येतो. तसंच काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीशीही विवाह लावण्यात येतो. 
  • दुधात हळद भिजवून पेस्ट करून ठेवावी 
  • तुळशीला आणि शाळीग्रामला अथवा कृष्णाला हळद कुंकू वाहून त्यावर दुधात हळद भिजवलेली पेस्ट त्यावर लावावी  
  • सदर हंगामात येणारी फळे अर्थात सिताफळ, सफरचंद, पेरू, डाळिंब, केळं ही पाच फळं तुम्ही पूजेच्या वेळी तुळशीला प्रसाद म्हणून अर्पण करावीत
  • अंतरपाट धरून तुळशीचा विवाह लावावा आणि त्यानंतर कापूराची आरती करावी आणि जमलेल्या सर्वांना प्रसाद वाटावा  

प्रत्येक गावात थोडाफार फेरफार करून पूजेचे विधी हे याप्रमाणेच असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरागत पद्धतीनेही तुळशी विवाह पूजा विधी करू शकता. 

Leave a Comment