लग्नानंतर होतोय पिंपल्सचा त्रास ही असू शकतात कारण

पिंपल्स कोणालाही नको असतात. नितळ त्वचेवर येऊन त्याचे सौंदर्य भंग केलेले नेमके कोणाला आवडेल नाही का? काही जण त्वचेच्या बाबतीत खरेच लकी असतात. त्यांना पिंपल्सचा फारसा त्रास नसतो. तर काहींना पिंपल्सचा त्रास इतका असतो की, त्यामुळे ते हैराण झालेले असतात. काही जणांना पिरेड्सनंतर पिंपल्सचा (Harmonal Pimples) त्रास सुरु होतो. तर काहींना लग्नानंतर पिंपल्सचा त्रास जाणवू लागतो. आपल्या शरीरात या दोन्हीही वेळा असे बदल होतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही असेच आहे. विशेषत: तरुणपणात आलेले पिंपल्स हे बऱ्यापैकी रिकव्हर होतात. पण लग्नानंतर शरीरात होणाऱ्या हार्मोनल्स बदलामुळे खूप जणांना जे पिंपल्स येतात ते काही केल्या कमी होत नाहीत. तुम्हालाही असा त्रास होऊ लागला असेल तर या मागे काही कारणे असू शकतात.

शरीरात वाढलेय का सीबम

 लग्नानंतर प्रत्येक महिलेचे आयुष्य बदलते. आयुष्यात सुखाचे क्षण आल्यामुळे काही काळासाठी काम किंवा इतर टेन्शन तसे बघायला गेले तर विसरायलाच होते. त्यामुळे खूप तण साहजिकपणे इतकी निवांत होतात की, त्यांचे वजन वाढण्यास सुरुवात होते. लग्नानंतर मुलीला सासर मानवले असे जरी वाटत असले तरी काही किलो वजनापासून हे वजन कित्येक किलोंवर जाऊन पोहोचते हे देखील कळत नाही. थोडे थोडे करुन जे वजन वाढते. त्याचा परिणाम हा शरीरात सीबम तयार होण्यावर होतो. शरीरात तयार होणारे सीबम (Sebum)  हे खरंतर त्वचेसाठी चांगले असते. त्यामुळे त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार होत असते. पण जर सीबम अतिप्रमाणात वाढले तर शरीरात तैलीय घटक वाढू लागतात. त्याचा परिणाम पिंपल्सवर होऊ लागतो. त्वचेवर अतिरिक्त प्रमाणात पिंपल्स यायला सुरुवात होते. जे त्वचेच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. जो पर्यंत वजन नियंत्रणात येत नाही तो पर्यंत पिंपल्स आटोक्यात येत नाही. 

शरीरात होणारे बदल

त्वचेत होतात बदल

सेक्स हा देखील एक सगळ्यात मोठा बदल या काळात होत असतो. शरीरात सेक्समुळेही विविध बदल होत असतात. लग्नानंतर मुलांसाठी प्रयत्न करणाऱी जोडपी ही ओव्हुलेशनच्या काळात सेक्स करत असतात. त्यामुळे शरीराला एक वेगळ्याच प्रकारची मरगळ येत असते. ही मरगळ देखील थकवा आणण्यास कारणीभूत असते. त्यामुळे होते असे की, एखाद्याचे शरीर व्यायामाचे असेल तर तो व्यायाम थांबतो. शरीर सुस्तावते. शरीरात आधीच झालेले बदल आणि त्यात सुस्तावलेले शरीर यामुळेही अगदी हमखास पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. 

चुकीचा आहार

लग्नानंतर लगेचच आपल्या शरीरात पूर्वीसारखा आहार जातो असे नाही.  दुसऱ्या कुटुंबात जाताना तेथील खानपान पद्धतीचा स्विकार करताना थोडासा वेळ जातो.  जे पदार्थ पूर्वी खाल्ले जात होते ते खाल्ले जात नाही. अशावेळी शरीराला आवश्यक घटक मिळाले नाही तरी देखील हा त्रास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुमचे वेळापत्रक सुनिश्चित करणे हे सगळ्यात जास्त गरजेचे असते. या शिवाय अनेकदा असे दिसून येते की, खूप जणांच्या शरीरात लग्नानंतर व्हिटॅमिन्सची कमतरता, सांधेदुखी असे काही देखील दिसून येते. (लग्नानंतरच असे होते असे नाही. तर त्या आधी काही गोष्टी होत असतात. पण शरीरात इतर कोणतेही बदल नसल्यामुळे शरीर तितकेसे त्रासत नाही. पण लग्नानंतर शरीरातील बदलामुळे हा त्रास प्रकर्षाने जाणवू लागतो) 

अशी घ्या काळजी

 अनेकदा आलेल्या पिंपल्सकडे खूप जण दुर्लक्ष करतात. त्यांना असे वाटते की पिंपल आलाय तसा जाईल. पण असे होत नाही खूप वेळा जे ॲडल्ट ॲक्ने येतात ते त्वचेवर अधिक काळासाठी राहतात. ते मोठे असतात. त्वेचची इलास्टिसिटी कमी होत असल्यामुळे ते अधिक त्रासदायक ठरतात. अशावेळी तुम्ही काळजी घ्यायला हवी. 

  1. सगळ्यात आधी तुम्ही एखादा चांगला त्वचेचा डॉक्टर शोधा. तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी अगदी नित्यनेमाने करा. 
  2. जर स्किनस्पेशलिस्टने दिलेल्या उपायांनी त्वचा नीट होत नसेल तर एकदा गायनॅकचा (Gynecologist) सल्ला घ्या. तुमच्या या बदलामागे काही कारणं त्यांना नक्कीच माहीत असू शकतात. 

आता तुम्हाला असा त्रास होऊ लागला असेल किंवा झाला असेल तर आताच्या आता योग्य सल्ला घ्या. 

Leave a Comment