#Yearend घरीच घालवायचा असेल तर पाहा हे चित्रपट

 काहीच दिवसांवर #Yearend आला आहे. अनेकांनी वेगवेगळे प्लॅन देखील केले असतील. पण जर या वर्षी तुम्हीह काहीही प्लॅन केला नसेल तर खास तुमच्यासाठी आम्ही घरी बसून movienight चा प्लॅन केला आहे. कुठेही न जाता मस्त आपल्या कोझी बेडवर पडून किंवा काऊचवर बसून तुम्ही मस्त या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. तुमच्या वेगवेगळ्या मूडसाठी आम्ही चित्रपटांची एक यादी काढली आहे. हे चित्रपट तुम्हाला निखळ हसवतील आणि तुमच्या वर्षाची सुरुवात नक्कीच चांगली करतील.

गोविंदा मेरा नाव ( Govinda Naam Mera)

कलाकार: विकी कौशल (Vicky Kaushal), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar),  कियारा अडवानी ( Kiara Advani), रेणुका शहाणे (Renuka Shahane) 

एखाद्या वादग्रस्त प्रॉपर्टीवरुन सुरु झालेला हा चित्रपट मस्त ट्विस्ट आणि टर्न घेणारा आहे. घरावर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवण्यासाठी जो खेळ सुरु होतो. तो विरोधकांवर उलटतो. पण ते उलटताना कोणताही मेलेड्रामा आणि डोक्याला ताप नाही तर त्यामधून तुम्हाला निखळ आनंद मिळतो. कियारा अडवानी,  भूमी पेडणेकर यांच्या भूमिका जितक्या दमदार आहेत. तितकेच रेणुका शहाणेचे कामही थोडे हटके आहे. विनोदी भूमिकेत तिला असे पहिल्यांदा पाहिल्यानंतर खूप जणांना थोडे आश्चर्य वाटेल. पण तिच्या आणि विकीच्या भूमिकेने याला चारचाँद लावले आहेत. 

 (हा चित्रपट तुम्ही पाहू शकता Disney Hotstar वर)

 गुडलक जेरी (Good Luck Jerry)

कलाकार : जान्हवी कपूर (Janhavi Kapoor), मिता वशिष्ठ (Mita Vashist), समता सुधिक्षा ( Samanta Sudhiksha) 

 गुडलक जेरी हा चित्रपट साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे. एक अत्यंत सर्वसाधारण घरातील मुलगी. जिच्या आईला कॅन्सर होतो. तिच्यासाठी पैसे जमवण्याचा विचार करत असताना तिला अचानक एका ड्रग्ज रॅकेटमध्ये अनावधानाने जाते. ती त्यांच्यासोबत काम करु लागते. पण ते इतके सोपे नाही हे तिलाही माहीत असते. त्यातून आपला फायदा करुन घेत ती कशी बाहेर पडते हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. 

(हा चित्रपट तुम्हाला Disney Hotstar वर पाहता येईल.)

डबल XL (डबल XL)

कलाकार : हुमा कुरेशी ( Huma Qureshi),सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)

वजन हा कायमच खूप महिलांसाठी विचार करणारा विषय असतो. कारण आजही आपल्याकडे एखाद्याचे वजन जरा जास्त असेल तर लगेच तिला बॉडी शेम केले जाते. पण शरीराच्या जाडीपेक्षाही महत्वाचे असते ते म्हणजे काम आणि जिद्द, तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्ही काहीही करु शकता. आत्मविश्वास वाढवणारा हा चित्रपट तितकाच मजेशीर आहे. 

(हा चित्रपट तुम्हाला Netflix वर पाहता येईल) 

Leave a Comment