Tunisha Sharma Case : शिजानच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची होणार चौकशी

 तुनिषा मृत्यूप्रकरणात (Tunisha Sharma Case ) रोज नव्याने वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. या आत्महत्येसाठी तुनिषाचा कथित बॉयफ्रेंड आणि तिचा सहकलाकार शिजान खान (Sheezan Khan) याची कसून चौकशी केली जात आहे. तुनिषासोबत त्याचे तिच्या मृत्यूपूर्वी ब्रेकअप झाले असले तरी देखील त्याची एक सिक्रेट गर्लफ्रेंड असल्याचा खुलासा आता पोलिसांनी केला आहे. तुनिषासोबत असतानाही तो त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पोलीस तुनिषाच्या आत्महत्येमागे हे कारण तर नाही ना? असा तपास सुरु आहे. दरम्यान, तुनिषाने लिहिलेली चिठ्ठीही अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे

व्हॉटसॲपवरुन लागला शोध

तुनिषा आत्महत्या प्रकरण हे जरी कितीही सरळ- सोपे दिसत असले तरी देखील ते तितके सोपे आहे असे वाटत नाही. कारण यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसत आहे. तुनिषाने आत्महत्या केली त्या आधी 15 मिनिटे आधी ती शिजानशी बोलत होती. त्यामुळे पहिला संशय हा शिजानवर बळावला होता. ही दोघं एका मालिकेत काम करत होती आणि गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होती. पण असे असतानाही जूनपासून तुनिषासोबत तो आणखी एका मुलीला डेट करत असल्याचे त्याच्या व्हॉटसॲप चॅटमधून समोर आले आहे. पोलिसांना त्याचे चॅट मिळाले असून ही मुलगी त्याच्याच मालिकेच्या सेटवर असल्याचे समजले आहे. पण असे असले तरीदेखील पोलिसांनी त्या मुलीची ओळख ही सांगितलेली नाही. पण आता सिजानची सिक्रेट गर्लफ्रेंड यासाठी कारणीभूत आहे की नाही याची ही कसून चौकशी होत आहे. वर वर पाहता हे प्रकरण फार सोपे असेल असे वाटत असले तरी देखील यातील नवनव्या खुलास्यांमुळे आता या प्रकरणाला वळण मिळण्याची शक्यता आहे. 

 

पोलीस करणार चॅटचा तपास

शिजान (Sheezan Khan) च्या फोनमधून  250 ते 300 पानांचे चॅट सापडले आहेत असे दिसून आले आहे.  या सगळ्याची तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तुनिषासोबत नात्यात असतानाही शिजान तुनिषाची फसवणूक करत होता हे दिसत आहे. 24 डिसेंबर रोजी तुनिषाने गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. तिने सेटवरच आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ माजली होती. सेटवर आली त्यावेळी ती बरी होती. पण अचानक तिने आत्महत्या केल्यामुळे अनेकांना धक्का बसला. ज्यावेळी तुनिषाने आत्महत्या केली त्या आधी ती शिजानशीच बोलत होती. शिजानने तिच्या आत्महत्येनंतर जवळजवळ दोन तास त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत चर्चा केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिजावर संशय अधिक बळावल्याचे दिसून आले आहे. 

सापडले पत्र

आत्महत्या प्रकरणांमध्ये अनेकदा मृत व्यक्तीने लिहिलेल्या पत्राचा तपास केला जातो. तुनिषाचेही पत्र पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी या पत्राचा उल्लेख केला असला तरी देखील त्यामध्ये काय लिहिले आहे याची माहिती अद्याप दिलेली नाही. पोलिसांनी हे पत्र सिजानसाठी लिहिले असल्याचे सांगितले आहे. 

आता या तपासांती नेमका काय खुलासा होईल यासाठी तपास सुरु आहे. 

Leave a Comment