आजही भाईजानची प्रसिद्धी सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा जास्त

 बॉलिवूडचा भाईजान कोण? हे अगदी शेमडं पोरं ही सांगेल. हो ना! सलमान आता कितीही वर्षांचा असला तरी आजही त्याचे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत फॅन्स आहेत. नुकताच भाईजानचा वाढदिवस साजरा झाला. सलमानने (Salman Khan) 27 डिसेंबर रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला. त्याचा वयाचा आकडा कितीही मोठा असला तरी देखील आजही तो इतर कोणत्याही कलाकारांपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. कोणत्याही चित्रपटात त्याचा अगदी लहान जरी रोल असला तरी देखील तो चित्रपट आपोआप बॉक्स ऑफिसवर दणाणून चालतो. अशी सलमान खानची ख्याती आहे. भाईजानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया सलमान खान (Salman Khan) संदर्भातील अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी

सलमानचे खरे नाव

आपण सगळे सलमान खान या नावानेच सलमानला ओळखतो. पण 90 च्या दशकात अनेक सेलिब्रिटी आपली नावे बदलून ऑनस्क्रिनसाठी काही खास नावे ठेवत होती. तसेच सलमान खान याचे खरे नाव अब्दूल रशिद सलीम सलमान खान असे पूर्ण नाव आहे. फार कमीच जणांना त्याचे हे खरे नाव माहीत आहे.

सलमानचे रिलेशनशीप कॉन्ट्राव्हर्शीअल

रिलेशनशीपच्या बाबतीत सलमान खानकडे कधीच सकारात्मक नजरेने पाहिले जात नाही. कारण त्याच्या रिलेशनशीपमध्ये नेहमीच कॉन्ट्राव्हर्सी दिसून आली आहे. सलमान खानचे अनेक सेलिब्रिटींशी नाव जोडले गेले आहे. आजही या वयात त्याच्या रिलेशनशीपवरुन चर्चा केली जाते. ऐश्वर्या रॉय, संगीता बिजलानी, कतरिना कैफ, सोमा अली, लुलिया वैंतुर या काही सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. पण या कोणासोबतही त्याने लग्न केले नाही. काही ना काही कारणामुळे त्याचे नाते तुटले.

या आजाराने त्रस्त

सलमान 2011 साली एका गंभीर आजाराने त्रस्त होता. trigeminal neuralgia तो या आजाराने त्रस्त होता. हा चेहऱ्याच्या मसल संदर्भातील हा आजार आहे. त्याचा त्रास हा सलमानला खूप जास्त होता. असे त्याने अनेकदा सांगितले आहे. या आजाराच परिणाम त्याच्या आवाजावर झाला असून त्याचा आवाज बदलला आहे.

सलमान खान साजरी करतो ईद आणि गणेशोत्सव

सलमान खान गणेशोत्सव आणि ईद हे दोन्ही सण साजरे करतो. तो स्वत:ला ‘भारतीय’ म्हणणे अधिक पसंत करतो. त्यामुळेही सलमान अनेकांच्या आवडीच्या आहे.

बिग बॉसमधून घराघरात

सलमान खानला प्रसिद्धीची तशी काहीच गरज नाही. पण तो खरा घराघरात पोहोचला ते बिग बॉसमधूनच. तो गेली कित्येक सीझन बिग बॉसचे होस्टिंग करत आहे. त्याने होस्ट म्हणून हा शो केल्यानंतर हा शो दुसरा कोणीही होस्ट करु शकत नाही.

सलमानला मराठीचे वेड

सलमानला मराठी चित्रपटांवर विशेष प्रेम आहे. त्याला अनेकदा मराठी बोलायला देखील आवडते. मराठी चित्रपटांमध्ये कॅमियो करायला त्याला फार आवडते. रितेश देशमुखच्या माऊली या चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता. आता पुन्हा एकदा त्याने रितेशच्या वेड’ चित्रपटात तो दिसणार आहे. 

सलमानसंदर्भात अनेक कॉन्ट्राव्हर्सीजही आहेत. पण आज त्याचा उल्लेख इथे न केलेलाच बरा. 

Leave a Comment