मांड्यांना मांड्या घासतात, हे उपाय देतील आराम | Thigh Chafing 

खूप जणांना मांड्याना मांड्या घासण्याचा त्रास Thigh Chafing  असतो. थोड्यावेळ जास्त चालले की हा त्रास जाणवू लागतो. मांड्यांना मांड्या घासण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी साधारण एक कारण म्हणजे वजन वाढलेले असणे. जर तुमच्या मांड्या खूप जाड असतील किंवा तुमचे फॅट वाढलेले असतील तरीदेखील तुम्हाला मांडी घासण्याचा त्रास होऊ शकतो. वजन वाढणे हे एक कारण असले तरी देखील कपड्यांची फिटींग हे देखील या मागचे एक कारण असू शकते. मांड्यांना घट्ट असलेले कपडे अनेकदा मांड्या घासण्यासाठी कारणीभूत असतात. मांड्या सतत घासत असतील तर अशा ठिकणी जखम होते, मांड्या काळ्या पडतात शिवाय चालही बदलते. अशावेळी नेमके कोणते उपाय तुम्ही करायला हवेत ते जाणून घेऊया.

Period Smell: मासिक पाळीत येत असेल अधिक दुर्गंध तर टाळा या चुका

बेबी पावडर

जर तुमच्या मांड्या खूप घासल्या जात असतील. आंघोळीनंतर किंवा कपडे घालण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पायांना टाल्कम पावडक किंवा बेबी पावडर लावू शकता. बेबी पावडर किंवा टाल्कम पावडर लावल्यामुळे मांड्यांना मांड्या घासणे कमी होते. शिवाय जर तुम्हाला जखम झाली असेल तर त्यामुळे आराम मिळण्यासही मदत मिळू शकते.  जर तुम्ही कुठेही बाहेर जाणार नसाल तर अशावेळी मॉश्चरायझर किंवा एखादे कुलिंग क्रिम लावले तरी चालू शकते. पण बाहेर जाताना तुम्ही शक्यतो मॉश्चरायझर लावू नका. तुम्ही बेबी पावडर लावा.

लिप बाम

जर बाहेर असताना तुम्हाला असा अचानक त्रास जाणवू लागला असेल तर अशावेळी तुमच्याकडे असलेला लिप बाम तुम्ही मांड्याना लावला तरी देखील थोडासा आराम मिळू शकतो. त्यामुळे असा त्रास असणाऱ्यांनी आपल्यासोबत लिप बाम कॅरी करावा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच थोडा आराम मिळू शकेल.

विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण, सणासुदीच्या काळात चिंतेचे वातावरण

पेट्रोलियम जेली

अनेक त्रासांसाठी पेट्रोलियम जेली ही फारच उत्तम अशी आहे. त्यामुळे मांड्या लाल झाल्या असतील किंवा आग होत असेल तर तुम्ही हमखास पेट्रोलियम जेलीचा वापर करुन तुम्ही आराम मिळवू शकता. पेट्रोलियम जेली लावून तुम्ही थोडावेळ ठेवले तर त्यामुळे थंडावा मिळण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. 

या शिवाय अशी घ्यावी काळजी

मांड्याना मांड्या घासणे

मांड्यांना मांड्या Thigh Chafing  तरीही घासत असतील तर तुम्ही काही आणखी गोष्टी करायल्या हव्यात असे केले की, तुम्हाला हा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. 

  1. मांड्याचे फॅट कमी करण्यासाठी अनेक व्यायाम असतात असा व्यायाम केला कीमांड्यांवरील फॅट कमी होते आणि हा त्रासही कमी होतो. 
  2. पायांसाठी चालणे हा एक उत्तम असा व्यायाम आहे. जर तुम्ही दररोज काही अंतर चाललात की, त्यामुळे पायांचे फॅट लवकर कमी होते. इतकेच नाही तर पायांना वजन लावून चाललात की त्याचा फायदा होतो. 

आता मांड्यांना मांड्या Thigh Chafing  घासण्याचा त्रास होत असेल तर या गोष्टी नक्की करा. 

Leave a Comment