हळदीकुंकवाला वाण देण्यासाठी बेस्ट आयडियाज

 मकरसंक्रांतीपासून सुरु झालेले हळदीकुंकू आता येत्या रथसप्तमीपर्यंत म्हणजेच 28 जानेवारी 2023 पर्यंत हळदीकुंकू करता येणार आहे. हळदी कुकंवाची मजा ही खरी तर वाण देण्यात असते. कोणाकडे काय वाण दिले? हे कितीही नाही म्हटले तरी आपण एकदा तरी पाहतोच. तुम्हीही अजून हळदीकुंकू घातले नसेल आणि यंदा कोणते वाण द्यायचे असा विचार करत असाल तर आम्ही काही खास आयडियाज तुमच्यासाठी निवडल्या आहेत. वाणाचे हे आयटम नक्कीच प्रत्येक सुवासिनीला आवडतील असेच आहे. चला जाणून घेऊया हळदीकुंकवाला देण्यासाठी बेस्ट वाण आयडियाज

ब्लाऊज कव्हर किंवा साडी कव्हर

महिलांसाठी साडी हा वीक पॉईंट असतो. साड्या रोज नेसो वा नेसो पण आपल्या सगळ्यांकडेच साड्या असतात. या साड्या नीट ठेवण्यासाठी साडी कव्हर किंवा साडीवरील ब्लाऊज ठेवण्यासाठी ब्लाऊज कव्हर असे तुम्हाला नक्कीच देता येईल. साडी कव्हर आणि ब्लाऊज कव्हर कापड आणि प्लास्टिक अशा दोन्ही प्रकारात मिळतात. त्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे. 50 रुपयांच्या आत तुम्हाला हे कव्हर मिळेल.

स्वयंपाकातील गोष्टी

खूप जणांना वापरातील अशा गोष्टी द्यायला खूप आवडतात. म्हणजे त्याचा उपयोग कोणत्याही स्वयंपाकात करता येतो. गुळाची ठेप, साखर, चहा पावडर अशा काही गोष्टी तुम्हाला नक्कीच देता येतील. या गोष्टी रोजच्या जेवणात कधी ना कधी वापरात येतात. प्रत्येकाला या गोष्टी अगदी हमखास लागतात. त्यामुळे या गोष्टी देण्यासही हरकत नाही.

शृंगाराच्या गोष्टी

महिलांना श्रृगांराच्या गोष्टी अगदी हमखास आवडतात. त्यामुळे कानातल्या कुड्या, बांगड्या, पाऊच. फेस पावडर, क्रिम, टिकल्यांचे पाकिट, मॉश्चरायझर, लिप बाम,नथ, इमिटेशन ज्वेलरी अशा गोष्टी तुम्हाला नक्कीच देता येतील. या गोष्टी उपयोगी येतात शिवाय महिलांना आवडणाऱ्या असतात.तुमच्या बजेटनुसार या गोष्टी निवडा.तुमच्या बजेटनुसार या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. 

देवघरातील सामान

देवपूजेसाठी लागणारे साहित्यही हळदीकुंकवाला देण्यास काहीच हरकत नाही. देवघरातील सामान अर्थात तुम्हाला करंडा, सुगंधी अगरबत्ती, गंध, धुप, कापूर, सुंगधी अत्तर असे तुम्हाला नक्कीच देता येतील. या गोष्टीही तुम्हाला अगदी 20 रुपयांपासून पुढे मिळतील. 

इनडोअर प्लान्ट

जर तुमचा बजेट थोडा जास्त असेल तुमच्याकडे कमीत कमी जणांना द्यायचे असेल तर तुम्हाला काही इनडोअर प्लांट्स देता येतील. अनेक इनडोअर प्लान्ट हे सकारात्मकता आणि यश देण्यासाठी तुम्हाला मदत करत असतात. त्यामुळे या इनडोअर प्लान्टचा उपयोग तुम्ही अगदी हमखास करायला हवा. 

आता हळदीकुंकवाला काही हटके असे गिफ्ट नक्की द्या.

Leave a Comment