Bigg Boss 16 : अर्चनाचा घरात पुन्हा एकदा राडा, स्टॅन घेईल का एक्झिट

 Bigg Boss 16 च्या घरात सध्या नव्या कॅप्टनच्या पदी अब्दू रोझिक (Abdu Rozik) विराजमान झाला आहे. एक साधा सोपा टास्क घरात झाला त्यात अब्दू विजयी झाला आणि पुन्हा एकदा त्याला कॅप्टनपद मिळाले. पण घरात जेव्हा जेव्हा नवा कॅप्टन झाला आहे. त्या त्या वेळी अर्चनाने (Archana Gautam) घरात भांडण उकरुन काढलेले आहे. कारण कोणतेही असले तरी अर्चना घरात कोणत्याही कारणावरुन जो वाद सुरु करते तो वाद विकोपाला कसा जाईल याची पुरेपूर काळजी घेते. आता मंगळवारच्याच एपिसोडचं घ्या ना  अब्दू कॅप्टन होत नाही तोच तिने ड्युटीवरुन जो काही वाद करायला सुरुवात केली त्यानंतर टीव्हीचा रिमोट घेऊन तो काही काळ म्युट करायची इच्छा झाली. काय झालं नेमकं चला घेऊया जाणून 

स्टॅनच्या कामावरुन वाद

घरात अर्चनाच्या म्हणण्यानुसार एक मंडली आहे. यात  शिव, साजिद, निमरित, अब्दू, स्टॅन, सुम्बुल यांचा समावेश आहे. अनेकदा कॅप्टन हा या गटातून होतो. कारण त्यांची एकी आहे.  अर्चनाला अनेकदा कॅप्टन व्हायचे असते. पण घरात ती कोणाशीच तशी चांगली नसल्यामुळे तिला कोणाचा तसा पाठिंबा मिळत नाही. आता काल अब्दू कॅप्टन झाल्यानंतर तिला अचानक घरातील कामांची अधिक काळजी होऊ लागली. स्टॅन ( mc stan) हा घरात काम करत नाही असे सांगत तिने वाद घालायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळ्या गोष्टी निगुतीने सुरु होत्या. पण हळुहळू तिने त्यामध्ये जरा जास्तच बोलायला सुरुवात केली. अर्चना एखाद्याला बोलण्यास इतके उकसवते की समोरची व्यक्ती काहीही बोलायला सुरुवात करते. स्टॅनच्या बाबतीत अगदी तसेच झाले. कारण तो आधीच कमी बोलतो. त्यात जो जितकं बोलतो त्याच्या पंच लाईन या सगळ्यांना आवडतात. पण अर्चनाने त्याची आई-वडीलांची नस पकडून त्याला बोलायला सुरुवात केली मग काय त्यानेही नको नको ते बोलून अर्चनाला हैराण केले. पण या सगळ्यात झाले असे की, अर्चनाने पुन्हा एकदा माझ्या आईला बोलला असे म्हणत मुद्दा अधिकच वेगळ्या दिशेला नेला. त्यामुळे स्टॅनला घरातून पुन्हा एकदा बाहेर पडण्याची इच्छा झाली. 

साजिदने ओळखला खेळ

साजिद खानच्या (Sajid Khan) च्या काही गोष्टी या नक्कीच कोणाला अनेकदा पटत नसतील. पण त्याचे निरिक्षण नक्कीच चांगले आहे. अर्चनाही नेहमी वीकेंडच्या वारसाठी आपला मुद्दा शोधत असते. तिला जास्तीत जास्त काळ स्क्रिनवर दिसायचे असते. त्यासाठी ती आठवडाभरात इतके काही करते की, सलमान खान (salman khan) ला येऊन तिची शाळा घ्यावीच लागते. त्यामध्ये तिला जास्तीत जास्त वेळ मिळतो. अनेकदा तिला समजावूनही सांगण्यात आले आहे. पण मी करते ते सगळे बरोबर असे समजून ती जे काही करते आणि त्यानंतर काहीच होत नाही यामुळे तिचा आत्मविश्वास भलताच वाढलेला दिसतो. साजिदला तेच नको असते. म्हणूनच तो कालच्या एपिसोडमध्ये स्टॅनला तू काहीही बोलू नकोस असे सांगतो. तिला केवळ मुद्दा हवा आहे. तिला भांडायला काहीही मुद्दा मिळाला नाही की, ती मुद्दा शोधते आणि भांडण करते असे साजिदने स्टॅनला सांगितले पण स्टॅनला हे काही पटलेले दिसत नाही. 

आता स्टॅन अर्चनाच्या भांडणाला कंटाळून पुन्हा एकदा घरी जाण्याचा तगादा तर लावणार नाही ना? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment