Winter Special : मटारपासून विविध रेसिपी (Green Matar Recipe In Marathi)

 थंडी सुरु झाली की, बाजारात मटार दिसू लागतात. मटार हे अनेकांच्या आवडीचे आहेत. या काळात अनेक भाज्यांमध्ये असे ताजे मटर घातले जातात. हिरव्यागार शेंगामधील मटार हे सुरुवातीला महाग असतात. पण त्यानंतर अगदी 30-40 रुपये किलो दराने मिळू लागतात. मटार स्वस्त होऊ लागले की, अनेक जण स्टोअर करण्यासाठी मटार आणतात. जास्तीचे मटार आणले की, ते वर्षभर वेगवेगळ्या रेसिपीसाठी मिळतात. पण या सीझनमध्ये मटारपासून काही खास रेसिपी तुम्ही अगदी हमखास करायला हव्यात. चला जाणून मटारच्या अशा सोप्या रेसिपीज (Green Matar Recipe In Marathi)

मटार निमोना (Matar Nimona)

‘मटार निमोना

मटार निमोना ही एक प्रकारची मटारची ग्रेव्ही असलेली भाजी आहे.  युपी- बिहारमध्ये अशा भाज्या या सीझनमध्ये केल्या जातात. ही भाजी करायला खूपच सोपी आहे. ही तुम्ही एकदा तरी करायला हवी. 

साहित्य : 2 वाटी मटारचे दाणे,  आलं-लसूण- मिरची- कोथिंबीर, जीर, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, जिरं, लाल सुकी मिरची,हळद, मीठ, तेल, पाणी, हिंग, सोलून उभा चिरलेला एक बटाटा

कृती :

  • 1 वाटी मटार वेगळे काढून ते धुवून ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यामध्ये आलं-लसूण-मिरची- कोथिंबीर- जिरं घेऊन  पाणी न घेता ते जरा रवाळच वाटून घ्या. 
  • आता एका कढईत तेल किंवा तूप गरम करुन त्यामध्ये जिरं, हिंग, सुकी मिरची याची छान फोडणी द्या. त्याच फोडणीमध्ये चिरलेला बटाटा घाला. आता त्यात हळद, मीठ घालून त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेले मटारचे मिश्रण घाला. तिखट आणि गरम मसाला घालून ते चांगले एकजीव करा. 
  • आता त्यात उरलेले 1 वाटी मटारचे दाणे अख्खे घाला. चवीनुसार मीठ घालून मटार शिजेपर्यंत ग्रेव्ही चांगली उकळू द्या. वाटलेले मटार घातल्यामुळे ग्रेव्ही छान जाड होते. ही भाजी मस्त गरम भातासोबत खायला अधिक चांगली लागते. 

मटार कचोरी

मटार कचोरी

मटार कचोरी ही देखील तितकीच चविष्ट अशी डिश आहे. अनेक ठिकाणी ही वर्षभर मिळते. पण तुम्ही या सीझनमध्ये एकदा तरी फ्रेश मटारपासून करायला हवी. 

साहित्य: 1 वाटी मटार, उकडलेला बटाटा. आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर,  पारीसाठी मैदा, मोहनासाठी तूप, तळण्यासाठी तेल 

कृती :

  • कचोरी करणे तसे फारसे कठीण नाही. जर तुमचे सारण चांगले चविष्ट असेल तर कचोरी चांगलीच लागते. 
  • कचोरीच्या सारणासाठी तुम्हाला सगळ्यात आधी मटारचे दाणे थोडेसे भरडून घ्यायचे आहेत. ( मटार आधी उकडून घेतले तर अधिक चांगले), 1 उकडलेला बटाटा, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर, मीठ घालून ते एकजीव करुन घ्यायचे आहे. 
  • कचोरीमध्ये सगळ्यात महत्वाचे असते ते म्हणजे त्याचे कव्हर. त्यासाठी तुम्हाला मैदा हा छान मळून घ्यावा लागेल. मैद्यामध्ये थोडासा ओवा, तूपाचे मोहन घालून ते मळून घ्यावे. घट्ट असे पीठ मळल्यावर मग जाड अशी पोळी लाटून त्यामध्ये मटारचे सारण भरायचे आहे. तेल तापल्यानंतर मध्यम आच करुन त्यामध्ये कचोरी तळायची आहे. 

एकदा तरी थंडीत मटार कचोरीचा घाट नक्कीच घालायला हवा. इतकेच काय तर तुम्ही मटारच्या आणखी काही रेसिपीही नक्कीच करायला हव्यात 

Leave a Comment