दोन शतकांचा वारसा असलेली ट्रुफिट अँड हिलची शाखा आता ठाण्यात

ट्रुफिट अँड हिल (Truefitt And Hill) या गेल्या दोन शतकांपासून ब्रिटिशांच्या उच्चभ्रू स्तरामध्ये (Elite Class) कार्यरत असलेल्या केशकर्तनालयाची (Salon) शाखा ठाणे शहरात सुरू होणार आहे. या निमित्ताने ठाण्यात लक्झरी ग्रूमिंगचा (Luxury Grooming) अनुभव घेता येणार आहे. घोडबंदर रोडवरील आर मॉलच्या समोर ट्रुफिट अँड हिल सुरू झाले असून या निमित्ताने ठाण्याची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या ठिकाणांमध्ये अजून एकाची भर पडली आहे. ही नवी शाखा म्हणजे भारतीय उपखंडात मार्च 2025 पर्यंत 30 शहरांमध्ये 50 लक्झरी सलॉन्स सुरू करण्याच्या कंपनीच्या विस्तारीकरण धोरणाचा हा एक भाग आहे.या लक्झरी सलॉनचे उद्घाटन लॉयड्स लक्झरी लिमिटेड अध्यक्ष श्री. कृष्णा गुप्ता आणि एएनएनएन रिटेल एलएलपीचे (फ्रान्चायझी मालक, ट्रुफिट अँड हिल, ठाणे) संचालक श्री. आशिष अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. ठाण्यात फक्त पुरुषांसाठी असलेले सलॉन नव्हते. त्यामुळे ट्रुफिट आणि हिलच्या शाही टचसह लक्झरी ग्रूमिंगला चालना देण्यासाठी ठाणे ही एक उत्तम बाजारपेठ आहे.

रॉयल सेवेचे सलॉन

ठाण्यातील स्टोअर ब्रँडच्या अभिरुचीसंपन्न व उच्चभ्रू वारशाला साजेसे आहे. १००० चौ. फुटाच्या विस्तीर्ण क्षेत्रफळात हे स्टोअर असून त्याचे इंटिरिअर अभिजात आहे, उबदार हस्तिदंती रंगाच्या व महागनी लाकडापासून त्याचे इंटिरिअर तयार केले आहे. या वातावरणात ब्रँडच्या चोखंदळ ग्राहकांना आरामदायी सुविधा मिळते. रॉयल शेव्ह, रॉयल हेअरकट या सिग्नेचर सेवांसह ट्रुफिट अँड हिला तर्फे मेंबरशिपही देण्यात येते. या अंतर्गत ग्राहकांना कॉम्प्लिमेंटरी लाभ, अनेक प्रसिद्ध ब्रँड वर खास डिस्काउंट मिळतात. लाँचबद्दल बोलताना लॉइड लक्झरी लि.चे अध्यक्ष श्री. कृष्णा गुप्ता म्हणाले, “लक्झरी ग्रूमिंगबाजारपेठ आणि वैयक्तिक निगा व ग्रूमिंग आपल्या आधुनिक जीवनशैलीचे अविभाज्य भाग झाले आहेत, याचा हा सकारात्मक संकेत आहे. आमच्या लक्झरी ब्रँडसाठी ठाणे हे उत्तम ठिकाण आहे.या स्टोअरच्या माध्यमातून मुंबईजवळील घोडबंदर रोडवर असलेल्या उच्चभ्रू उपनगरात आमच्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. कारण हे ठिकाण, रिटेल बाजारपेठेसाठी नंदनवन एचएनआय आणि  यूएचएनआयसाठी एक स्वर्गच आहे. आमच्या ग्राहकांना आमच्या उत्तम सेवा व उत्पादने उपलब्ध करण्याची आम्ही ट्रुफिट अँड हिलमध्ये खात्री देतो. केस कापण्यापासून ते दाढी करण्यापर्यंत प्रत्येक सेवा नेमकेपणाने, काटेकोर स्वच्छतेसह व सुरक्षेसह प्रदान करण्यात येते. ट्रुफिट अँड हिलने लॉइड लक्झरीज लिमिटेडसह भारतातील १४+ शहरांमध्ये २७ एक्सक्लुझिव्ह अत्याधुनिक केशकर्तनालये सुरू केली आहेत. वाढत्या मागणीची पूर्तता करताना नजीकच्या भविष्यात ग्रूमिंग क्षेत्रासाठी नवी क्षितिजे व संधींचा लाभ घेण्यासाठी हा ब्रँड आशादायी आहे. ते एक उत्कृष्ट शाही स्पर्शाचा अनुभव देतात, जो आपल्या आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे.

लॉइड लक्झरीजचे व्यवस्थापकीय संचालक व सीओओ श्री. प्रणय डोकानिया म्हणाले, “गेल्य दशकभरात पुरुषांच्या ग्रूमिंगमध्ये खूप बदल झाल्याचे आपण पाहिले आहे आणि पुरुषसुद्धा कपडे व त्यांच्या लूकविषयी सजग झाले आहेत. आम्ही पुरुषांच्या ग्रूमिंग उत्पादनांमध्ये मार्केट लीडर आहोत. ही उत्पादने खास भारतीय पुरुषांसाठी निवडण्यात आली आहेत.” श्री.आशीष अरोरा एएनएनएन रिटेल्स एलएलपीचे संचालक (फ्रान्चायझी मालक, ट्रुफिट अँड हिल, ठाणे) म्हणाले, “ग्रेट ब्रिटनमधील सलग नऊ राज्यकर्त्या सम्राटांचे ग्रूमिंग केलेले ट्रुफिट अँड हिल हे आजही स्टाईलचे खंदे बुरुज मानले जातात. लॉइड लक्झरीज लिमिटेडसोबत भागीदारी करणे आणि ठाणे शहरात येणे ही बहुमानाची बाब आहे.

ठाण्याच्या लोकांना नवीन अनुभव हवे असतात आणि ठाणे शहरातील पुरुषांच्या लक्झरी ग्रूमिंग चोखंदळ ग्राहकांना हा चोख अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत, अशी आमची खात्री आहे.” हाय-एंड लक्झरी मेन्स ग्रूमिंग सेवांव्यतिरिक्त ट्रुफिट अँड हिलमध्ये शॅम्पू, सेरम, आफ्टरशेव्ह बाम, बाथ अँड शॉवर जेल, कलोन, लक्झरी शेव्हिंग सोप, शेव्हिंग क्रीम, ब्रश इत्यादी पुरुषांसाठीची ग्रूमिंग उत्पादने आहेत. या उत्पादनांमुळे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रसंगोचित आणि खुलून येते. ट्रुफिट अँड हिलबद्दल ग्रेट ब्रिटनच्या सलग नऊ राज्यकर्त्या सम्राटांना ग्रूम केलेले ट्रुफिट अँड हिल स्टाइला वारसा पुढे नेत आहेत. ब्रिटनमधील प्रतिष्ठितांचे व्यक्तिमत्व खुलविण्यात महत्त्वपूर्ण आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतो आणि आता एच. आर. एच द ड्युक ऑफ एडिनबर्गचे आम्ही रॉयल वॉरंट होल्डर आहोत.

दोन शतकांहून अधिक काळापासून ट्रुफिट अँड हिल हे पुरुषांसाठीचे जगातील सर्वात जुने सलॉन आहे. उत्तम प्रकारे ग्रूम करण्यासाठी त्यांच्यातर्फे विविध प्रकारच्या सेवा प्रदान करण्यात येतात. पारंपारिक इंग्लिश सुगंध, शेव्हिंगसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि पुरूषांच्या ग्रूमिंग किटच्या उत्कृष्ट गुणवत्तेचे शोधक म्हणून ओळखले जाणारे हे सलॉन आपल्या खास ग्राहकांना जगात कुठेही अतुलनीय लक्झरी सेवा देते.

Leave a Comment