‘अ’वरुन मुलांची अर्थपूर्ण नावे (A varun mulanchi nave)

आपल्या मुलांची नावे हटके आणि अर्थपूर्ण असावी असे सगळ्याच पालकांना वाटते. मुलांची नावे ठेवताना अनेकदा आपण अशी काही नावे ठेवतो ज्यांचा अर्थ जाणून घेणे फार कठीण जाते.मध्यंतरीच्या काळात मुलांची किंवा मुलींची नावे ठेवताना अर्थाचा फारसा विचार केला जात नव्हता. पण आता खूप जण मुलामुलींची नावे ठेवताना अर्थ काय? याचा अधिक विचार करतात. ज्या बाळांची रास मेष असते अशांचे आद्याक्षर अनेकदा ‘आ’ असते. तुमच्याही मुलाचे आद्याक्षर ‘अ’ आले असेल तर तुमच्यासाठी काही अर्थपूर्ण नावे शोधून काढली आहेत.  (A varun mulanchi nave)

अ वरुन अर्थपूर्ण पौराणिक नावे

अ वरुन मुलांची पौराणिक नावे

अ वरुन मुलांची पौराणिक नावे ठेवण्याचा विचार केला असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही अर्थपूर्ण पौराणिक नावे शोधून काढली आहेत. त्यांचा अर्थ तुम्हाला आवडला तर ती तुम्ही ठेवू शकता.

मुलांची नावेनावांचे अर्थ
अश्वत्थामाहुशार आणि उग्र स्वभावाचा
अश्वसेन महाभारतातील तक्षक नावाच्या नागाचा पुत्र
अभिमन्यूआत्मसन्मान, आवेशपूर्ण, वीर, अर्जुन-सुभद्राचा मुलगा
अवनीशपृथ्वीचा देव, पृथ्वीचा राजा
अंकुश हत्तीला काबुत ठेवणारे शस्त्र 
अंबरढग 
अंबरिशसुंदर आणि आकर्षक
अनिरुद्ध विजयी, निर्विरोध जिंकणारा, असीम, अजेय
अच्युत श्रीकृष्णाचे एक नाव, सुंदर आणि आकर्षक 
अनश्वरकधीही नश्वर नसलेला 

अ वरुन मुलांची लेटेस्ट नावे

अ वरुन मुलांची काही लेटेस्ट नावे ठेवण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला अशी काही लेटेस्ट नावेही नक्कीच ठेवता येतील. त्यासाठी काही लेटेस्ट आणि अर्थपूर्ण नावे शोधून काढली आहेत.

मुलांची नावे नावांचे अर्थ
अर्णव तेजस्वी, महासागर
अर्थव गणपतीचे नाव, आनंदी
अभिलाषसक्रिय, अनुकूल, भाग्यवान 
अंजलदोन्ही हातांनी अर्पण करणे, ओंजळ
आर्चीससूर्याची पहिली किरण
अखिलसंपूर्ण
अद्वयएकजूट, अद्वितीय
अनधपवित्र, दोष-रहीत
अन्वयतर्कपूर्ण
अमोदआनंद, आनंदाचा स्रोत

अ आद्याक्षरावरुन मुलांची नावे ठेवायची असतील तर ही काही नावे तुम्हाला नक्कीच ठेवता येतील.

Leave a Comment