‘कपल थेरपी’ वापरा आणि नातं वाचवा 

कोणत्याही नात्यात चढउतार हे असतातच. पण नात्यातील समस्या सोडविण्यासाठी जेव्हा तुम्हाला इतर कोणाची तरी मदत घेण्याची गरज भासते तेव्हा मात्र नक्कीच यावर विचार करण्याची गरज आहे. वास्तविक नातं बिघडत असेल तर ते सुधारण्यासाठी एक उत्तम थेरपी आहे. एखाद्या जोडीमध्ये भांडणे होणं ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. पण अति भांडणामुळे नातं तुटतं आणि प्रकरण घटस्फोट घेण्यापर्यंत जातं. पण तुम्हाला नातं वाचवायचं (Relationship) असेल तर तुम्ही कपल थेरपीचा (Couple Therapy) नक्की वापर करावा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कपल थेरपी म्हणजे नक्की काय तर त्याबाबत सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

कपल थेरपी म्हणजे नक्की काय? (What is Couple Therapy)

प्रत्येक नात्यात वाद असतातच. आपल्या नात्यातील भांडणं सोडवणं हे केवळ मुद्दाच सोडवित नाही तर आपल्या नात्याला अधिक मजबूत करण्यात एक मुख्य भूमिका निभावते. कपल थेरपीमध्ये एखादे तज्ज्ञ कौन्सिलर (Expert Counselor) हे नातं अधिक घट्ट बनविण्यासाठी मदत करत असतात. यासाठी विशिष्ट शिक्षण घेतले जाते. ज्यामध्ये लग्न आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांची जाणीव करून देण्यात येते. दोन्ही पक्षाकडून व्यवस्थित मूळ कारण आणि गोष्टी जाणून घेतल्या जातात. अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली थेरपी (American Association Of Marriage And Family Therapy) नुसार, सर्व्हेक्षणात 98 टक्के विवाह आणि कौटुंबिक गोष्टी या अधिक चांगल्या असतात असं सांगितलं आहे. ऑनलाईन रिसोर्सेस आणि टेलिहेल्थने कपल थेरपी ही अधिक सोपी करून दिली आहे. तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल आणि तुमचे नाते वाचवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन गोष्टी वाचूनही याचा अभ्यास करून तसं करू शकता. 

काय आहे कपल थेरपी टेक्निक (Couple Therapy Technique)

1. गंभीररित्या आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेणे 

सौजन्य – Freepik.com

कोणत्याही नात्यात एकमेकांचं ऐकून घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपलं तेच खरं करत राहणं हे कधीच नात्याला पुढे घेऊन जात नाही. गोष्टी ऐकून घेऊन त्यावर योग्य पद्धतीने विचार करणे, चिंतन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा जोडीदार एकमेकांचे व्यवस्थित ऐकून घेतात. कोणताही वेगळा अर्थ न काढता नक्की काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा नातं अधिक घट्ट होण्याकडे त्यांचे पाऊल वळू शकते असंही दिसून येते. 

2. भावनात्मक स्वरूपात जाणून घेणे 

कोणतंही नातं हे अधिक स्वरूपात भावनिक गुंतलेलं असतं. पण जसजसा कालावधी एकमेकांसोबत जातो तेव्हा भावनिक नात्यापेक्षा गृहीत धरण्याची प्रक्रिया अधिक दिसून येते. नात्यामध्ये दोन्ही व्यक्ती या सुरक्षित असायला हव्यात. शारीरिक वा मानसिक दोन्ही त्रास सहन करत कोणतंही नातं टिकत नाही. त्यामुळे भावना हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात भांडणं होत असतील तर नक्की काय चुकत आहे याचा भावनिक स्वरूपात विचार करणे कपल थेरपीमध्ये महत्त्वाचा ठरतो. 

3. गॉटमॅन थेरपी (Gottman Therapy)

सौजन्य – Freepik.com

गॉटमॅन मेथड कपल थेरपिस्टमध्ये अत्यंत प्रसिद्ध पद्धत आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी या पद्धतीचा अधिक वापर करण्यात येतो. तसंच जोड्यांमध्ये असणाऱ्या इंटिमसी (Intimacy) आणि कौटुंबिक समायोजन अशा मुद्द्यांमध्ये याचा वापर करता येतो. तसंच नातं बिघडलेल्या जोड्यांसाठी लाईव्ह वर्कशॉप (Live Workshop) आणि टेक होम प्रशिक्षण (Tech Home Training) देखील देण्यात येते. 

4. इमागो रिलेशनशिप थेरपी (Imago Relationship Therapy)

इमागो रिलेशनशिप थेरपी ही वयस्क संबंध आणि लहानपणीचे अनुभव यामधील काळावर अधिक जोर देते. लहानपणी झालेले आघात, वागण्यामागील मानसिकता आणि कोणत्या वेळी कशी सहानुभूती देता येऊ शकते यावर योग्य अभ्यास करून जोडप्यांमधील नांत वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येतो

5. आपल्या जोडीदाराच्या प्रेमाची भाषा ओळखा (Love Language) 

उगीचच एखाद्या नात्यात राहण्याची खरंच काही गरज नाही. तुम्ही जितकं प्रेम करत आहात तितकंच प्रेम समोरची व्यक्ती करत आहे की नाही ही प्रेमाची भाषा समजून घेण्याची खूपच गरज आहे. त्यामुळे तुमचं नातं टिकण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्याची स्वतःची अशी एक पद्धत आहे. पण ती पद्धत आपल्या जोडीदारासह नातं टिकविण्यासाठी वापरणं अत्यंत गरजेचे आहे. 

या 5 सवयी असतील तर तुम्हीही व्हाल ‘आदर्श जोडी’

घरातील शांतता भंग झाल्यासारखे वाटत असेल तर करा या गोष्टी

नणंदानी कधीही करु नयेत या चुका

Leave a Comment