आदिपुरुषच्या टीझरवर सेलिब्सच्या संतप्त प्रतिक्रिया

 2023 मधील सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरणारा ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचा टीझर हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर जितका दमदार आहे तितकाच वादग्रस्त देखील ठरला आहे तो केवळ सैफ अली खानच्या लुकमुळे. या चित्रपटात सैफने (Saif Ali Khan) रावणाची भूमिका साकारली आहे. त्याचा तो लुक पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. रावण हा जरी नकारात्मक भूमिकेत असला तरी त्याचे मुघलांसारखे दिसणे किंवा त्याला तितका क्रूर दाखवणे हे अनेकांना भावलेले दिसत नाही. त्यामुळे रावणाच्या या लुकवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया या उमटताना दिसत आहेत. सेलिब्सनी नेमक्या काय संतप्त प्रतिक्रिया दिल्य आहेत ते घेऊया जाणून

FIFA वर्ल्ड कपमध्ये नोरा फतेही करणार परफॉर्मन्स, जेनिफर आणि शकीरानंतर नोराला मान

  देवी देवतांचे केले विडबंन

संतप्त राम कदम यांनी केलेले ट्विट

 टीझर पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना ते दमदार वाटले तर काहींना त्यातून देवी देवतांचे विडंबन केले जात आहे असे वाटले. भाजप नेते राम कदम यांनी देखील ट्विट करुन या चित्रपटाला बॅन करण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असे देखील त्यांनी यामध्ये म्हटले आहे.  त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हिंदू देवी देवतांची विडंबने केली आहेत. त्यामुळे हिंदू लोकांच्या आस्थेला आणि श्रद्धेला धक्का बसला आहे. पुढे त्यांनी  हे ही म्हटले आहे की, चित्रपटातील काही दृश्ये काढून टाकून चालणार नाही. अशी वाईट विचारसरणीच काढून टाकणे गरजेचे आहे. 

दिवाळीत सजणार ‘हर हर महादेव’चे तोरण, टीझर प्रदर्शित

रावणाचा लुक आवडला नाही

सैफ अली खानचा रावण लुक

चित्रपटाचा टीझर न आवडण्यामागे रावणाचा लुक असल्याचे प्रामुख्याने सांगितले जात आहे. सैफ अली खानने या आधीही अनेक ग्रे शेड असलेल्या भूमिका साकारल्या आहेत. पण या चित्रपटात त्याने रावणाची भूमिका साकारताना त्याला दिलेला लुक हा रावणाचा अजिबात वाटत नाही. रावण हा श्रीलंकेचा त्याला मुघलांसारखे का दाखवावे. असे मत रामायण या मालिकेतील सीतेची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी केले आहे. या शिवाय त्यांना पुढे सांगितले की, त्यांना टीझरमध्ये फार कमी काळासाठी रावण दिसला. त्यात VFX आणि अन्य गोष्टी आल्यात. पण लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले 

दमदार VFX

बाहुबली स्टार प्रभास या चित्रपटात भगवान श्री रामाची भूमिका साकारत आहे. त्याला पुन्हा एकदा अशा पौराणिक पात्रात पाहून लोकांना आनंद होणे साहजिक आहे. कारण त्याला पाहिल्यानंतर रामाचा साक्षात्कार झाल्यावाचून राहणार नाही. ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांचा आहे. यासाठी मोठी मानधनाची रक्कम प्रभास (Prabhas)आणि सैफ अली खान(Saif Ali Khan)ला देण्यात आलेली आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर यातील VFX पाहून तोंडात बोट जातील अशीच आहेत. खूप दिवसांनी पडद्यावर पुन्हा एकदा अशी VFX पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट येत्या 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. 

पण सध्या रावणावरुन सुरु असलेली कॉन्ट्राव्हर्सीज पाहता यात पुढे किती बदल होईल, चित्रपटाची तारीख किती पुढे जाईल ही शंकाच आहे. दरम्यान, तुम्हाला आदिपुरुषचा टीझर कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 

Leave a Comment