कोल्हापुरी चपलांची अशी घ्या काळजी

पावसाळा संपल्यानंतर आपल्या फुटवेअरच्या आवडीमध्ये वेगवेगळी भर पडत असते. मुलींच्या शू रॅकमध्ये स्निकर्स (Sneakers), शूज (Shoes), हाय हिल्स (High Heels), चप्पल्स (Chappals) असे बरेच पर्याय असतात. उन्हाळा आणि हिवाळ्यात कोल्हापुरी चप्पल (Kolhapuri Chappals) हादेखील एक उत्तम पर्याय असतो. कुर्ती असो वा जीन्स कोणत्याही कपड्यांवर कोल्हापुरी चपलेचा साज मस्त वाटतो. स्टायलिश फुटवेअर (Stylish Footwear) बाबत बोलायचे झाले तर हँडक्राफ्ट चप्पल आणि कोल्हापुरी चप्पल हा चांगला पर्याय सध्या दिसून येतो. पण कोल्हापुरी चपल्लांची नीट काळजी घेतली नाही तर या चप्पल लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसंच या जुन्या दिसू लागतात. कोल्हापुरी चप्पल तुम्हाला जास्त काळ टिकवायच्या असतील तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. उदाहरणार्थ फंगसपासून चप्पल वाचवायला हव्यात आणि कोरड्या जागी नेहमी चप्पल ठेवायला हव्यात. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या आणि कोल्हापुरी चप्पल्सची काळजी घ्या. 

कशी कराल कोल्हापुरी स्वच्छ (How to Clean Kolhapuri Chappal)

कोल्हापुरी चप्पल स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मुलायम कपडा वापरावा. सुती वा मुलायम कपड्याने यावरील धूळ स्वच्छ करावी. तसंच धुळीचे कण अडकले असतील तर जुन्या ब्रशच्या सहाय्याने हे स्वच्छ करावेत. कोल्हापुरी चपलेवर माती साचली असेल तर या दोन्ही पद्धतीने ती स्वच्छ करता येते. तसंच किमान आठवड्यातून एकदा तरी तुम्ही आपली चप्पल स्वच्छ करावी. त्यावर धूळ साचू देऊ नये. 

तेलाचा करा वापर (Use Oil)

सौजन्य – Freepik.com

कोल्हापुरी वापरायला काढण्यापूर्वी आपण त्याला तेल लावून ठेवतो. जेणेकरून चपलेचा करकर असा आवाज येऊ नये आणि चप्पल पायाला लागू नये. पण तुम्ही तेलाचा वापर त्यावरील धूळ माती काढण्यासाठीही करू शकता. चप्पल स्वच्छ करण्यासाठीही तुम्ही तेलाचा उपयोग करू शकता. एका बाऊलमध्ये 2 मोठे चमचे नारळाचे तेल घ्या. त्यात एक कॉटनचा कपडा भिजवा आणि हलक्या हाताने चपलेला घासा. हे तेल संपूर्ण चपलेला लागले आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्या. चपलेच्या Sole वरदेखील तुम्ही तेलाचा उपयोग करून घ्या. हवेतील दमटपणा चपलेला लागू नये यासाठी तेलाचा उपयोग होतो. याशिवाय तेल हे लेदरचा चमकदारपणा आणि मऊपणा जपून ठेवण्यास उपयोगी ठरते.  

कागदात बांधा 

एकदा चपलेला तेल लावले की ही कोल्हापुरी चप्पल तुम्ही कागदात बांधा. कागदामध्ये चप्पल गुंडाळताना त्याचा काळेपणा चपलेला लागणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर वरून रबर लावा. जेणेकरून आतमध्ये हवा जाऊ शकणार नाही. आता ही चप्पल तुम्ही कॉटनच्या बॅगमध्ये ठेवा आणि ही बॅग एखाद्या कोरड्या ठिकाणीच ठेवा. तुम्ही अशा पद्धतीने कोल्हापुरी चप्पल ठेवली तर तुमच्या चप्पल्स कधीच खराब होणार नाहीत आणि जास्त काळ टिकतील याची नक्की खात्री आहे. 

या गोष्टीची घ्या काळजी 

सौजन्य – Freepik.com

तुमची कोल्हापुरी चप्पल अधिक काळ तुम्ही झाकून ठेऊ नका. यामुळे त्याला फंगस लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मधूनमधून ही चप्पल वापरायला काढा आणि नंतर त्याचप्रमाणे तुम्ही पुन्हा गुंडाळून ठेवा. याशिवाय चप्पल कधी कधी एक तास उन्हात ठेवणेही योग्य आहे. 

तुम्हाला जर कोल्हापुरी चप्पल घातल्यानंतर त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्ही चप्पल घालण्याआधी पायांना मॉईस्चराईजर लावा. जास्त लावू नका नाहीतर चप्पल घसरण्याचाही धोका असतो. कोल्हापुरी चपलेला तुम्ही आठवड्यातून एकदा वा दोनदा पॉलिशदेखील करू शकता. ज्यामुळे चपलेची चमक कायम टिकून राहाते. 

का नाव पडले कोल्हापूर, कोल्हापूर नावाचा मनोरंजक इतिहास

प्लस साईज महिलांनी या टिप्स करा फॉलो आणि दिसा स्टायलिश

स्किन पिअर्सिंगवर होणार नाही इन्फेक्शन, या गोष्टींची घ्या काळजी

Leave a Comment