Pregnancy Conceive करायची असेल तर या गोष्टी माहीत असायला हव्यात

आई व्हायचं स्वप्न प्रत्येक स्त्रीचं असतं. पण हल्लीच्या धकाधकीच्या काळात महिलांना प्रेग्नंसी (Pregnancy Conceive )कन्सिव्ह करणे फार कठीण जाते. डॉक्टरांकडे प्रेग्नंसीशीसंबधित अनेक तक्रारी घेऊन महिला येत असतात.काही जणांना योग्य ज्ञान नसते, तर काही जण या बाबत गंभीर नसतात.  प्रेग्नंंसी कन्सिव्ह न होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी तुमचे कारण कोणते? हे जाणून घेेणे फार गरजेचे आहे. तुम्हीही आई होण्याचा विचार केला असेल तर त्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेेणे गरजेचे असते. आई होणे हे केवळ शरीरसंबंध ठेवून होत नाही तर त्यासाठी तुमची शारीरिक आणि मानसिक दोन्ही तयारी करणे गरजेचे असते. चला जाणून घेऊया या conceive meaning in pregnancy संदर्भातील महत्वाच्या गोष्टी

आई व्हायचे हे मनाशी पक्क करा

आई होणे हा नवरा-बायको यांचा सर्वस्वी निर्णय असतो. ज्यावेळी तुम्हा दोघांना आई-वडील होण्याची इच्छा होईल त्याचवेळी तुम्ही बाळ होण्याचा निर्णय घ्या. अनेकदा लग्नानंतर घरात खूप जणांना बाळ होण्याची घाई असते. पण इतरांचा कितीही हट्ट असला तरी तुमच्या दोघांची मानसिक आणि शारिरीक तयारी नसेल तर हा मोठा निर्णय घेऊ नका. कारण आई होणे म्हणजे पुढील 9 महिने आणि त्यानंतर येणारा काळ बाळांसाठी आई- वडीलांसाठी एक वेगळा काळ असतो. दोन्ही पालकांना अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे आधी ही तयारी असू द्या.

ओव्ह्युलेशन सायकल माहीत हवी

आई होताना

Pregnancy Conceive करण्यासाठी योग्य काळ कोणता? हा तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या फोनमध्ये ovulation cycle नावाचे कोणतेही ॲप डाऊनलोड करा. Pregnancy Conceive करण्यासाठी ओव्ह्युलेशनचा काळ हा महत्वाचा असतो. त्या दिवसात Pregnancy Conceive होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. यामध्ये तुम्हाला तुमची मासिक पाळी तारीख आणि किती दिवसांसाठी येते याची नोंद करायची असते. उदा. तुम्हाला 10 तारखेला मासिक पाळी आली असेल आणि ती पाच दिवस राहिली असेल तर त्यानंतर 7 दिवसांनी तुमची ओव्ह्युलेशन सायकल सुरु होते. या काळात प्रेग्नंसीची शक्यता सर्वात जास्त असते. त्या काळात जर शरीरसंबंध ठेवले तर तुम्हाला गुडन्यूज मिळू शकते. 

ताण-तणाव नको

conceive meaning in pregnancy चा विचार करत असाल तर तुम्ही केवळ सगळ्या गोष्टी मेकेनिकल करुन चालत नाही आणि त्यात कोणतीही भावना नसेल तर तुम्हाला गुडन्यूज मिळूनही अर्थ नाही. कारण अनेक जण खूप विचार करुन ताण घेऊन या सगळ्या गोष्टी करत असतात. ओव्ह्युलेशन सायकल फॉलो करताना तुम्ही जर खूप विचार करत असाल तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसणार नाही. त्यामुळे ताण-तणाव घेऊन या गोष्टी करु नका. 

वाचनाची सवय लावा

गुडन्यूज मिळाली की, मग खूप जण गर्भसंस्कार वाचायला घेतात. पण पालक होण्याची तयारी करतानाच तुम्ही हे पुस्तक वाचले तर त्याचा फायदा तुम्हाला अधिक होऊ शकेल. आई -बाबा होताना तुम्ही आधीच ही पुस्तक वाचा. बाळाचा जन्म ही कितीही सोपी गोष्ट वाटत तरी त्यामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे माहीत  असायला हवे. पुस्तकांमध्ये तुम्हाला ही माहिती अधिक चांगली मिळते. म्हणून जितकी चांगली पुस्तके वाचता येतील तितकी पुस्तकं वाचून त्याचा फायदा घ्या. 

आता आई -बाबा होण्याआधी या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Leave a Comment