काय आहे Pregnancy Journal, होणाऱ्या आईकडे असायलाच हवे

आई होणे याहून  कोणतेही मोठे सुख स्त्रीच्या आयुष्यात नसते. आनंदाची ही बातमी मिळाल्यानंतर प्रत्येक स्त्रीमध्ये (Mother To be) बदल घडू लागतात. तिचे सगळे विश्व हे तिच्या पोटातील बाळाभोवती फिरु लागते. बाळाची वाढ, त्याचे संगोपन, गर्भसंस्कार, त्यासाठी लागणारा योग्य आहार अशा सगळ्या गोष्टींचा विचार स्त्री करु लागते. आताच्या काळात या गोड आठवणी जपण्यासाठी आपल्याकडे मोबाईल फोन असतो. बाळाच्या वाढीशी निगडीत सगळे महत्वाचे टप्पे आपण या मध्ये नोंदवून ठेवत असतो. पण मोबाईल फोन स्वतंत्रपणे या आठवणींनी भरणे शक्य नसते. अशावेळी तुमच्याकडे अशी गोष्ट असायला हवी ज्याच्या मदतीने तुम्ही बाळाच्या वाढीचे सगळे टप्पे नोंदवून ठेवू शकतात. हल्ली बाजारात Pregnancy Journal मिळतात. ज्यांचा उपयोग करुन तुम्हाला या 9 महिन्याच्या काळात बाळाच्या सगळ्या गोष्टी नीट लावून ठेवता येतात. चला जाणून घेऊया या विषयी अधिक 

Pregnancy Journal म्हणजे काय?

PREGNANCY JOURNAL

 ज्या प्रमाणे आपण सगळे रोजनिशी लिहित असतो. अगदी त्याचप्रमाणे Pregnancy Journal  हे मिळत असतात. यामध्ये बाळाच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यांची नोंद केली जाते. 

  1. तुम्हाला ज्या दिवशी आनंदाची बातमी मिळते. तो आनंद शब्दात वर्णन करण्यासारखा नसतो. अशावेळी तुम्ही चेक केलेला किट त्यामध्ये ठेवण्यासाठी जागा असते. त्या दिवशी तुमच्या मनात आलेल्या भावना तुम्हाला तेथील पानावर लिहू शकता. 
  2. आनंदाची बातमी कळाल्यानंतर बाळाच्या वाढीचा पहिला टप्पा म्हणजे त्याच्या ह्रदयाचे ठोके. आता तो आवाज तुमच्या कानांना आनंद देतो. पण त्या दिवशी तुम्ही केलेली सोनोग्राफी ही कायम तुमच्या दृष्टीक्षेपात राहावी असे तुम्हाला वाटल्यावाचून राहणार नाही. अशावेळी तुमच्या सोनोग्राफीचे फोटो तुम्ही काढून यामध्ये लावू शकता. 
  3. वाढत जाणारे पोट हे प्रत्येक आईला जितक्या वेदना देते तितकाच बाळ मोठे होत आहे याचाही आनंद देत असते. हा आनंद आपण अनेकदा फोटोंच्या माध्यमातून काढून ठेवत असतो. खूप जण आपली प्रेग्नंसी ही गुप्त ठेवतात. अशावेळी तुमचे हे फोटो तुमच्या जर्नलचा महत्वाचा भाग होऊ शकतात. तुमचे गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत. अशावेळी ते फोटो तुम्हाला नक्की आनंद देतील. 
  4.  बाळाच्या वाढीचे महत्वाचे टप्पे आपण सोनोग्राफीद्वारे पाहात असतो. ही सोनोग्राफीही काही ठराविक काळात केली जाते. त्या सगळ्या गोष्टींची नोंद केली जाते. 
  5. हे एक मेमकी बुक आहे. यात तुमच्या या काळातील महत्वाच्या आठवणी असतात.  9 महिन्यांच्या प्रवासाव्यतिरिक्त तुम्ही त्यानंतरही काही काळ बाळांच्या वाढीचे वेगवेगळे टप्पे फोटो यामध्ये ठेवू शकतात. 

आठवणींचा हा ठेवा तुमच्या बाळांना भविष्यात जाऊन त्याविषयी अधिक आनंद देईल यात काहीही शंका नाही. 

खरेदीसाठी क्लिक करा

Leave a Comment