अनेक रहस्यांचा उलगडा करणारी ‘कंपास’ वेबसिरीज लवकरच

वेबसिरिजच्या माध्यमातून होणारे मनोरंजन हे हल्ली प्रेक्षकांच्या सगळ्यात आवडीचे आहे. वेगवेगळे विषय वेबसिरिजच्या माध्यामातून बेधडकपणे मांडले जातात. प्लॅनेट मराठीच्या माध्मातून अनेक असेच विषय हाताळले गेले आहेत. आता यात आणखी एका सिरिजचा समावेश होणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी रहस्यमयी अशा ‘कंपास’ या सिरिजने करणार आहे. या सिरिजची खासियत अशी की, ही सिरिज मल्टीस्टारर असणार आहे. यात तुम्हाला मराठीतील अनेक सुप्रसिदध चेहरे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहता येणार आहेत.या सिरिजचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. यात उर्मिला कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पुर्णिमा डे, खुशबू तावडे, संग्राम साळवी, सुयश टिळक, सौरभ गोखले अशा काही नावाजलेल्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

क्राईम थ्रीलर घेऊन लवकरच

प्लॅनेट मराठी घेऊन येत आहे नवी सिरिज

प्लॅनेट मराठीने नेहमीच वेगवेगळ्या विषयाच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांची निवड ही त्यांच्यासाठी खूपच महत्वाची असते.त्यामुळे गेल्यावर्षी मनोरंजनात्मक कंटेट हा जास्ती जास्त तयार करण्यात आला असे प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले. याला थोडी बगल देत यावेळी थोडा नवा विषय प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी ‘कंपास’ च्या माध्यमातून वेगळा विषय घेऊन येणार आहे.  कंपास ही सिरीज एक क्राईम थ्रीलर आहे. याचे चित्रीकरण सुरु झाले आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पण मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच केला जात आहे असे या सीरिजचे दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी सांगितले. 

त्यामुळे अगदी काहीच दिवसात ही सिरिज आपल्याला पाहता येणार आहे. 

Leave a Comment