चाहत्यांसाठी शिव ठाकरेच विजेता,शिवसाठी असा दर्शविला पाठिंबा

Bigg Boss 16 चा फिनाले आता अगदी 10 दिवसांवर आला आहे. तिकिट टू फिनाले वीकची रेस सुरु झाली आहे. यात काही जणांना संधी मिळाली तर काही जणांना त्या रेससाठी थोडी हालचाल करावी लागणार आहे. सध्या घरात शिव, निमरित, सुम्बुल हे नॉमिनेट आहेत. त्यामुळे फिनाले वीकमध्ये कोण जाईल? कोण जाणार नाही? हे या आठवड्याच्या शेवटी समजेल. दरम्यान, आपला मराठी माणूस शिव ठाकरे (Shiv Thakare) फिनाले रेसमध्ये अजूनही सेफ झाला नसला तरी देखील तोच खरा विजेता असल्याचे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी अत्यंत सुंदर अशा नृत्याचे सादरीकरण केले आहे.

अमरावतीने दिला असा पाठिंबा

अमरावतीच्या छोट्याशा गावातून आलेला शिव यशाचे अनेक टप्पे पार करत Bigg Boss मध्ये आला आहे. ‘तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं’ असेच काहीसे शिवबद्दल झाले आहे. शिव अगदी पहिल्या दिवसापासून या खेळासाठी परफेक्ट आहे हे दिसून आले आहे. त्याचे कौतुक  सलमान खानने देखील केले आहे.शिवची प्रसिद्धी पाहता तो या नव्या सीझनचा विजेता व्हावा असे सगळ्यांनाच वाटते. त्याला पाठिंबा देण्यासाठीच खास त्याच्या होमटाऊनमध्ये अर्थात अमरावती येथे फरशी स्टॉप आणि राजकमल चौकात त्यासाठी खास फ्लॅशमॉब सादर करण्यात आला. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

शिवने निवडली मैत्री

रिॲलिटी शोमध्ये अनेकदा पुढे जाण्यासाठी केवळ संख्याबळाचा वापर केला जातो. शिवची मैत्री ज्यांच्यासोबत आहे त्यांचा उपयोग त्याने कधीही संख्या वाढवण्यासाठी केलेला नाही. तर त्याने ती मैत्री म्हणून जपली आहे. अनेकदा शिव आपल्या मित्रांना ‘कुटुंब’ म्हणून संबोधतो. तशी मैत्री तो दाखवतोसुद्धा. पण घरातील इतर सदस्य या मैत्रीला तोडण्याचा प्रयत्न फार आधीपासून करत आहेत. आता घरात अर्चना आणि प्रियांका उरलेल्या मंडलीला तोडण्याचा अटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचा कोणताही विपरित परिणाम या मैत्रीत होताना दिसत नाही. इतकेच काय तर शिवच्या चारित्र्यावरुनही अनेकदा अर्चना आणि प्रियांकाने काही विधाने केली आहेत. पण असे असले तरी शिवची प्रसिद्धी काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे तो या घरातील सगळ्यात दमदार खेळाडू आणि उत्तम व्यक्ति आहे यात काही शंका नाही.

सुम्बुलमुळे बसला नॉमिनेशनचा फटका

घरात नुकतेच नॉमिनेशन कार्य पूर्ण झाले आहे. यावेळी थोडे वेगळ्या पद्धतीने हे नॉमिनेशन कार्य पार पडले. वेळेवर अवलंबून असलेले असे हे कार्य होते. यामध्ये दोन टिम करण्यात आल्या होत्या. तिकिट टू फिनाले वीक  निमरित कौर अलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) च्या नावावर असल्यामुळे तिला यातून सुट मिळाली.  या खेळात कमीत कमी वेळ घ्यायचा होता. यात सुम्बुलच्या वेळेमध्ये गडबड झाली त्यामुळे स्टॅन, शिव, सुम्बुल नॉमिनेट झाले. त्यामुळे आता या तिघांपैकी कोणाला फटका बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान, शिवसाठी मिळत असलेला पाठिंबा पाहून मराठी माणूस शिव शो मध्ये विजेचा बनवूनच परत येईल असा विश्वास चाहत्यांना आहे. 

Leave a Comment