5 +Old saree Reuse |जुन्या साडीपासून शिवा या गोष्टी

Old saree Reuse करण्याचा विचार अनेकदा आपल्या मनात येतो. कारण कपाटात कित्येक अशा साड्या असतात. ज्यांचा उपयोग आपण करत नाही. काही साड्यांमध्ये आपल्या भावना जोडलेल्या असतात. अशावेळी आपल्याला या साड्या फेकायची कोणाला देऊन टाकण्याची इच्छा अजिबात होत नाही. अशावेळी या साड्यांचा उपयोग करुन तुम्हाला अशा काही गोष्टी बनवता येतील. ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. शिवाय तुमची साडी वाया गेल्याचेही तुम्हाला वाटणार नाहीत. तुमचे ब्लाऊज झाला असेल ढगळ, तर वापरा सोप्या टिप्स तुम्हाला नक्की कामी येतील. चला जाणून घेऊया जुन्या साडीपासून Old saree Reuse नक्की कसा करता येईल.

साडीपासून गोधडी

साडीपासून गोधडी बनवणे हे फार काही नवे नाही. पण हल्ली गोधडी हा देखील एक ट्रेंड झाला आहे. कारण जर तुमची गोधडी सुंदर असेल तर नक्कीच तुमच्या बेडरुमचा लुकही त्यामुळे नक्कीच चांगला येतो. त्यामुळे जर तुमच्याकडे छान कॉटन सिल्कच्या साड्या असतील तर तुम्ही त्यापासून छान गोधड्या शिवू शकता. या गोधड्यांना फॅशनच्या दुनियेत क्विल्ट असे म्हटले जाते. ही क्विल्ट तुमच्या बेडवर सुंदर दिसायला हवी असे वाटत असेल तर तुम्ही छान साड्यांचे रंग निवडा. त्यामुळे जुन्या साडीपासून शिवा नक्की अशा सुंदर गोधडी

Old saree Reuse उशांची कव्हर

आपल्याकडे असलेल्या साड्या काही कारणास्तव विरतात. विशेषत: जरीच्या साड्या या नक्कीच काही कारणांमुळे विरत असतात. अशा साड्या फाटल्या की, त्यापासून काहीही बनवणे थोडे कठीण जाते. अशावेळी त्यापासून काही सोप्या आणि छोट्या गोष्टी बनवायच्या असतील तर तुम्ही उशांची सुंदर कव्हर बनवू शकता. साड्यापासून तयार केलेली उशांची कव्हर ही दिसायला खूपच सुंदर दिसतात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही डोकं लावून उशांच्या कव्हरांची डिझाईन ही सेट करुन शकता.

जुन्या साड्यांपासून शिवा वॉल पेटिंग्ज

जर तुम्हाला काही क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला तुमच्या साडीपासून वॉल पीसही तयार करता येऊ शकतात. साडीचा तुकडा घेऊन तो कोणत्याही फ्रेममध्ये लावू शकता. साडीचा पदर विशेषत:पैठणीसाडीचा पदर किंवा काठ वापरुन जर तुम्ही त्याचा उपयोग केला तर तुमच्या घराचा शो त्यामुळे नक्कीच वाढू शकतो. साडीच्या तुकड्याचा उपयोग करुन टेबलटॉप, छत, ट्रे हे देखील बनवता येऊ शकते. जे दिसायला खूपच सुंदर दिसते.

साडीपासून तुम्हालाही काही हटके आयडिया सुचत असतील तर आम्हाला नक्की पाठवा

Leave a Comment