घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सानिया मिर्झा-शोएब मलिक येणार एकत्र

अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या नात्यामध्ये कटुता आल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एका सेलिब जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने जोर धरला आहे. सानिया मिर्झा- शोएब मलिक यांच्यामध्येही गेल्या काही दिवसांपासून काहीच आलबेल नाही असे दिसून येत आहे. सानिया शोएबचे कोणतेही फोटो शेअर करताना दिसत नाही. तिच्या मुलासोबत हल्ली तिचे सगळे फोटोज शेअर केले जातात.शिवाय तिच्या या पोस्टवरुन ती सिंगल मदर असल्याचेही दिसत आहे. घटस्फोटाची ही बातमी ताजी असतानाच आता सानिया- शोएब पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे दिसत आहे. एका खास कारणासाठी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.

या कारणासाठी शोएब- सानिया एकत्र

सानिया आणि शोएब आता एकमेकांपासून वेगळे राहात आहेत. पण आता पुन्हा एकदा एका खास कारणासाठी ही जोडी एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंतर एका पाकिस्तानी शोच्या निमित्ताने हे दोघे एकत्र येणार आहे. उर्दू फ्लिक्स याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला असून हा शो मिर्झा- मलिक शो नावाने येणार आहे. या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये या शोची आधीच घोषणा करण्यात आली होती.पण आता हा शो लवकरच येणार आहे. हा शो नेमका कसा असणार आहे याची कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी देखील पोस्टर पाहता हा एक फॅमिली प्रकारातील शो असणार आहे असे दिसून येत आहे. चाहत्यांना त्यांनी वेगळे व्हावे अशी अजिबात इच्छा नाही. या शोच्या निमित्ताने हे दोघे परत एकत्र येतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

काय घडले?

सानिया आणि शोएब यांनी 2010 साली लग्न केले. दोघेही क्रिडा क्षेत्रातील असल्यामुळे त्यांची आपआपल्या क्षेत्रात चांगली मक्तेदारी आहे. त्यांनी एकमेकांना कायमच चांगली साथ दिलेली आहे. त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना 2018 साली मुलगा झाला. त्यांचे आयुष्य एकदम सुखात सुरु असताना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. कारण सानिया शोएबचे कोणतेही फोटो सध्या शेअर करताना दिसत नाही. सानिया- शोएबमध्ये काहीतरी बिनसले असावे याची कुणकुण याच गोष्टीमुळे अनेकांना लागली. खूप जणांनी दोघांचेही अकाऊंट पाहिल्यानंतर शोएबने तिचे कोणतेही फोटो डिलीट केले असावे असे दिसत नाही तर सानियाने मात्र कटाक्षाने शोएबचे फोटो टाळलेले दिसत आहे. या दोघांच्या मुलाचा वाढदिवस झाला त्याचा फोटो शोएबच्या अकाऊंटमध्ये दिसत आहे. पण हा फॅमिली फोटो सानियाने मात्र अजिबात शेअर केलेला दिसत नाही. त्यामुळे यांच्यात नक्कीच काहीतरी फाटले आहे. असे निश्चित झाले आहे. हे दोघं लवकरच एकमेकांपासून वेगळे होणार आहेत अशी देखील चर्चा होत आहे. पण आता या नव्या शोनंतर त्यांच्यातील दुरावा मिटेल अशी अपेक्षा अनेकांना आहे. 

दरम्यान सानियाचा हा शो तिच्या फॅन्ससाठी फार महत्वाचा असणार आहे.

Leave a Comment