अगदी 10 मिनिटात बनवा मस्त ‘रस्सम’, सोपी रेसिपी (Rasam Recipe)

 भातासोबत विविध प्रकारच्या डाळी आपण नेहमीच खातो. मुगाची, तुरीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण मस्त गरम गरम रस्समची रेसिपी पाहणार आहोत. रस्सम हा प्रत्येक मराठमोळ्या घरात होणारी रोजची रेसिपी नाही. पण साऊथमध्ये रस्स्म हा एकदम कॉमन अस पदार्थ आहे. भुरकून प्यायला हे रस्सम चांगले लागते. गरम गरम भातासोबत रस्सम हे अधिक चविष्ट लागते. रस्समची ही रेसिपी झट की पट होणारी आहे. इतकीच नाही तर कमी साहित्यात चविष्ट अशी होणारी आहे. चला तर जाणून घेऊया ही मस्त रस्सम रेसिपी (Rasam Recipe)

जाणून घ्या रस्समचा इतिहास 

‘रस्सम’ हे नाव तामिळमधील ‘आयरासम’ आणि संस्कृतमधील ‘रस’ यावरुन तयार झाले आहेत. आंध्रप्रदेशात याचा शोध लागला असे काही जुने दाखलेही आहेत. साधारणपणे 16 व्या शतकात याचा शोध लागला. तमिळनाडू वगळता इतर काही भागांमध्येही हीच(Rasam Recipe) रेसिपी केली जाते. पण त्याची नाव ही काही अंतराअंतराने बदलत जातात. त्यामुळे याला सगळीकडे ‘रस्सम’ म्हणत असतील असे निश्चित सांगता येणार नाही. चवीला आंबट- तिखट असे हे रस्सम अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. 

असे बनवा अगदी 10 मिनिटात रस्सम (Rasam Recipe)

Rasam Recipe In Marathi

साहित्य: 2 मोठे टोमॅटो, 2 चमचे जिरे, 1 चमचा काळीमिरी, 1 चमचा हिंग, ½ चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी चिंच,लसूण, मोहरी, कडीपत्त्याची पाने, सुकी लाल मिरची, मीठ, तेल

कृती :

  • मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये टोमॅटोच्या फोडी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, काळिमिरी, मीठ, लसूण,भिजवलेली चिंच घाला.  त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण चांगले वाटून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये सुकी मिरची, मोहरीची फोडणी द्या. फोडणी तडतडली की, त्यामध्ये टोमॅटोचे वाटप घाला. पातळ करण्यासाठी पाणी घाला. त्यात कडीपत्त्याची पाने कुस्करुन घाला. 
  • एक उकळ आली की, त्यात गरज असल्यास मीठ घाला. कोथिंबीर घालून चांगली उकळून घ्या. 

गरमा गरम रस्सम तयार! डाळ खाण्याचा खरंच मूड नसेल अशावेळी तुम्हाला असे मस्त रस्सम करता येईल. गरम गरम भातासोबत मस्त खाता येईल. 

Leave a Comment