Bigg Boss 16 : शिवच्या आईने जिंकली सगळ्यांची मनं, मिळाले खूप प्रेम

Bigg Boss 16 च्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. घरात स्पर्धकांचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने स्पर्धकांना बुस्ट करण्यासाठी नातेवाईकांना पाठवण्यात आले आहे. या सगळ्यांमध्ये सगळ्यांना जास्त प्रतिक्षा होती ती शिवच्या आईची. कारण शिवने काही दिवसापूर्वी आईची आठवण काढली होती आणि बिग बॉसने शिव ठाकरे (Shiv Thakre) ची इच्छा पूर्ण केली आहे. पण ज्या पद्धतीने शिवची आई अर्थात आशा ठाकरे घरात आल्या आणि सगळ्यांशी बोलल्या त्यानंतर हे नक्कीच कळले की, शिवमध्ये खेळाची असलेली जिद्द, आत्मविश्वास आणि प्रेमळ स्वभाव हा तिच्या आईसारखा आहे असेच म्हणायला हवे. आशा या शिवची आई असल्यातरी देखील त्यांच्या स्वभावामुळे त्या शोमधील सगळ्यांच्या आई होत इतरांची मनं जिंकून घेतली आहे.

शिवची आई निर्मळ प्रेमाचा झरा

आता पर्यंत जितके सीझन झाले आहे त्यामध्ये फॅमिली वीकमध्ये जे जे आले आहेत त्यांनी कोण कोणासाठी घातकं आहे हे सांगितले आहे. पण या सीझनमध्ये सगळेच वेगळे आहे. शिवची आई आल्यानंतर तिने सगळ्यांना अगदी मनापासून आणि आपली मुलं समजून मिठी मारली आहे. सगळ्यांना प्रेमाने उपदेशाचे धडे दिले आहे. शिव कुठे चुकतो? हे देखील त्याला सांगितले आहे. खेळ वगळता घरात नाते चांगले असायला हवे? हे  तिला मनापासून वाटते. म्हणूनच इतर स्पर्धकांना ती अगदी त्यांच्या आईसारखी भेटली आहे. या घरात सतत म्हटली जाणारी मंडली याव्यतिरिक्तही तिने इतरांशी खूप चांगला संवाद साधला आहे. त्यामुळे शिवच्या आईने सगळ्यांची मने जिंकली आहे. 

आत्मविश्वास वाखाणण्यासारखा

शिव हा अमरावतीच्या गावातून आला आहे. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक स्ट्रगल केला आहे आणि या पदाला पोहोचला आहे. मराठी बिग बॉसचा विजेता आणि आता हिंदी बिग बॉसचा टॉप स्पर्धक अशी ओळख आहे. अनेकदा मराठी असल्यामुळे इतका आत्मविश्वास दिसून येत नाही. पण शिवच्या आईचा आत्मविश्वास हा नक्कीच वाखाणण्यासारखा होता. तिचे बोलणे हे तिच्यातील आत्मविश्वास दाखवते. आपली मत तिने सगळ्यांपुढे ठाम मांडली. शिवही अगदी तसाच या घरात दिसतो.

फराहनेही उडवले हास्याचे फवारे

आता मंडलीबद्दल बोलतोय तर मंडलीच्या सदस्यांमध्ये साजिदचे नाव न घेता कसे चालेल. साजिदला भेटण्यासाठी त्याची बहीण फराह आली आहे. फराहने देखील आल्या आल्या सगळ्यांसोबत प्रेमाने बोलणे पसंत केले आहे. फराहमध्ये असलेला सेन्स ऑफ ह्युमर हा नक्कीच सगळ्यांना आवडेल असा आहे. त्यामुळेच तिने आल्या आल्या सगळ्यांशी मस्त असा संवाद साधला आहे. 

दरम्यान शिवच्या आईचा आत्मविश्वास आणि बोलण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरु नका. 

Leave a Comment