तुम्हाला माहीत आहे का पाव-भाजीची रोचक कहाणी, घ्या जाणून

रस्त्याच्या कडेला उभे राहून पाव-भाजीच्या स्टॉलवर पाव-भाजी (Pav Bhaji) खाण्याची मजाच काही वेगळी आहे. पाव – भाजी हे मुंबईचे आवडते स्ट्रीट फूड (Street Food Of Mumbai) आहे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी असो अथवा मुंबईतील अनेक खाऊ गल्ल्यांमध्येतरी पाव भाजीचे स्टॉल तुफान दिसून येतील. बटरसह स्वादिष्ट पाव-भाजी आणि कांदा – लिंबू हे कॉम्बिनेशन म्हणजे तोंडाला पाणीच. पण ही पाव-भाजी नक्की कशी अस्तित्वात आली आणि आपल्या मुंबई-महाराष्ट्रात इतकी कशी प्रसिद्ध झाली हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया पाव भाजीचा रोचक इतिहास. 

पहिल्यांदा पाव भाजी कुठे आणि कशी बनविण्यात आली? (History of Pav Bhaji)

सौजन्य – Freepik.com

साधारण 1860 ची ही गोष्ट आहे. अमेरिकेत त्यावेळी सिव्हिल वॉरची (Civil War) घोषणा झाली होती. त्यामुळे कापसाची मागणी तिथे जास्त वाढली. यादरम्यान भारत हा कापसाची निर्मिती आणि पुरवठा करणारा एकमेव देश होता. त्यामुळे ही मागणी वाढल्याने बॉम्बे कॉटन एक्स्चेंजच्या कामगारांना रात्र रात्र मेहनत करावी लागत होती. कारण अमेरिकेतून त्यावेळी टेलिग्रामद्वारे कापसाच्या नव्या ऑर्डर्स यायच्या. त्यांचे काम इतकी वाढले की, त्यांच्याजवळ जेवायलाही वेळ नव्हता. घरी उशीरा जाऊन त्यांना जेवण मिळणेही कठीण झाले होते. त्यामुळे कामानंतर खायला मिळावे यासाठी कामगारांनी एक युक्ती लढवली. स्टॉल लावणाऱ्यांशी बोलणी करून उरलेल्या भाज्यांची एकच भाजी बनवायची असे ठरले. 

काही लोक मग या भाजीसह गरमागरम पाव खाऊ लागले. स्टॉल लावणाऱ्यांनी त्यानंतर आपल्या मसल्यांसह या भाजीला एक स्वादिष्ट टच दिला आणि ती तिखट आंबट बनवली. बटर आणि पाव त्यामध्ये समाविष्ट करून कामगारांची भूक भागवू लागले. अशा पद्धतीने पाव – भाजीचा उगम झाला. 

मुंबईचे लोकप्रिय स्ट्रीट फूड कसे बनले? (How Pav Bhaji Became Mumbai’s Favorite Street Food)

पाव-भाजी – सौजन्य – Freepik.com

उरलेल्या भाज्यांसह टॉमेटो आणि बटाटा मॅश करून पहिल्यांदा भाजी बनविण्यात आली. सर्वात आधी बॉम्बे कॉटन एक्स्चेंज मिलच्या बाहेर स्टॉलवाल्यांनी कामगारांसाठी हे तयार केले. त्यानंतर हळूहळू मिल्सची संख्या वाढत गेली आणि ती संपूर्ण मुंबईभर झाली. जसजशा मिल्स वाढत गेल्या तसतशी पावभाजीदेखील मुंबईभर पसरू लागली. त्यामुळे रात्री भूक लागल्यानंतर खाण्यासाठी बाहेर पावभाजीचे स्टॉल वाढत गेले आणि पाव भाजी मुंबईची अत्यंत लाडकी होऊ लागली. आजही रात्री उशिरापर्यंत पाव-भाजीचे स्टॉल मुंबईमध्ये दिसून येतात. तर रात्री मुंबईत फिरताना आजही पाव-भाजी हा उत्तम पर्याय समजण्यात येतो. 

पाव-भाजीचे नाव कसे सुचले?

सौजन्य – Freepik.com

पाव भाजी खूप लवकर प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्याचे वेगवेगळे नाव ठेवण्यात येऊ लागले. मराठी भाषेत पाव म्हणजे एका पूर्ण भागाचा चौथा हिस्सा आणि पाव भाजीमध्ये पोळीचा एक तुकडा अर्थात त्यावेळी पाव देण्यात येत होता आणि त्यामुळेच याचे नाव पाव भाजी असेल पडले. 

तर काहींच्या तर्कानुसार, ‘पाओ’ या शब्दावरून पावाचे नाव आले. पोर्तुगालमध्ये चपातीचा अर्थ पाओ असून पोर्तुगालांनी मुंबई पावाची सुरूवात केली आणि म्हणूनच याचे नाव पावभाजी ठेवण्यात आले. याबाबत नक्की सांगता येत नाही. पण असे अंदाज बांधले जातात.

ही होती पावभाजीची गोष्ट. कशी वाटली तुम्हाला? उरलेल्या भाज्यांमधून पावभाजीची संकल्पना सुरू झाली आणि आता मुंबईचा सर्वात आवडता पदार्थ म्हणून ही पावभाजी ओळखली जाते. 

रोज भाजी खायचा कंटाळा आलाय तर बनवा असे वेगळे रायते

काही केल्या मोदक (Ukdicha Modak) जमत नाहीत… ट्राय करा या ट्रिक्स

या बेकिंग टिप्स वापरा आणि राहा निरोगी

Leave a Comment