निर्मात्याला पत्नीने रंगेहाथ पकडले, पण त्याने पत्नीलाच गाडीने उडवले

 मुंबईत एक अजबच किस्सा घडला आहे. एका पत्नीने पतीला रंगेहाथ दुसऱ्या महिलेसोबत पाहिले. तिने पतीला हटकण्याचा प्रयत्न केला. पण पतीने चक्क गाडीच आपल्या पत्नीवर घालण्याचा प्रकार केला आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात हा सगळा प्रकार घडला असून हा काही सर्वसामान्य व्यक्तीचा किस्सा नाही तर एका नामांकित चित्रपट निर्मात्याने हा सगळा प्रकार केला आहे. निर्माते कमल किशोर मिश्रा ही ती व्यक्ती असून एका पार्किंग लॉटमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. दरम्यान, पती आणि निर्माते कमल किशोर मिश्रा (Kamal kishore Mishra) यांना पोलिसांनी अटक केली असून हा सगळा नेमका प्रकार काय आहे चला घेऊया जाणून 

वायरल झाला एक व्हिडिओ

https://youtube.com/shorts/wpkrSulAwDw?feature=share

प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलून धरली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओदेखील वायरल होत आहे. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी घडली आहे. तर झाले असे की, कमल किशोर मिश्रा (kamal Kishor mishra )यांची पत्नी यास्मीन यांनी त्याच्या पतीला कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत असभ्यवर्तन करताना पाहिले. ते पाहून चिडलेल्या पत्नीने गाडीच्या काचेवर जोरात हात मारला. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरुन त्यांनी पतीला गाडीच्या बाहेर येण्यास सांगितले. पण असे न करता  मिश्रा यांनी गाडी थेट पत्नीच्या अंगावरुन नेली. असे करताना त्या जखमी झाल्या असे या वायरल व्हिडिओत दिसत आहे. त्यांनी पत्नीला उडवून चाकाखाली आणले. इतकेच नाही. तर गाडीचे चाक पुढे नेत तिला जखमी देखील केले.तिला असे गाडीखाली गेलेले पाहून तेथील एका व्यक्तीने तिला गाडीबाहेर काढले. पण त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. यास्मीन मिश्रा यांनी लगेचच पोलिसांत धाव घेत हा सगळा प्रकार सांगितला आहे. अंधेरीच्या आंबोली पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोण होती ती मॉडेल? 

यास्मीन मिश्रा यांनी आपल्या पतीला कोणासोबत पाहिले याचाही खुलासा केला आहे. ही मॉडेल आयेशा सुप्रिया मेमन (Ayesha supriya memon) असल्याचा दावा पत्नीने केला आहे. आयेशा ही मिस इंडिया आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आपले फोटोज बाहेर जाऊ नये या हेतूने तिने आपले अकाऊंट ही प्रायव्हेट करुन टाकले आहे. दुसरीकडे यास्मीनच्या आरोपानुसार मिश्रा यांनी घरातच बेकायदेशीरपणे आयेशाशी लग्न केले आहे. शिवाय यास्मीन यांनी तीन वेळा तलाक असे म्हणत घरातून काढून टाकले आहे. जर या गोष्टी खऱ्या असतील तर मॉडेल आणि मिश्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

यास्मीन आहे अभिनेत्री

कमल किशोर मिश्रा यांची पत्नी यास्मीन ही देखील अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमधून काम केलेले आहे. 9 वर्षांपासून कमल आणि यास्मीन एकत्र राहात आहेत.कमल यांनीही या काही काळात देहाती डिस्को,मार्शल, धर्मस्य अशा काही चित्रपटांची निर्मिती केली आहे.  कमल हे अनेकदा सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात फसवतात. त्यांना गिफ्टस देणे आणि त्यांना आपल्या संपत्तीबद्दल सतत सांगून त्यांना आपल्या बाजूने करतात असे देखील सांगितले आहे. या संदर्भात पोलीस काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Leave a Comment