जालना आंदोलकाच्या दगडफेकीचा व्हिडिओ पोलिसांना केला जारी

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यात उमटत आहेत. या लाठीचार्ज संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असताना महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून रविवारी त्यांच्यावर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

यावेळी दगडफेकीत ३७ पोलीस जखमी आणि यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे. लाठीचार्जच्या आधी नेमके काय घडले याचा व्हिडिओ पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. लाठीचार्जचे जगभरात पडसाद उमटले असून याला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. कोणाच्या डोक्याला, कोणाच्या पायाला तर कोणाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. तर दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे दिसून येत आहे.

सदर घडलेल्या लाठीचार्जनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, ‘उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ही राज्याची जबबादारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल, तब्येत खरब होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करणं जरुरीचं आहे. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलं होतं. पण त्यांनी तुम्ही उद्या या, असं सांगितलं. प्रशासन आज पुन्हा गेलं आणि विनंती केली. पण आज पोलिसांना घेरुन दगडफेक करण्यात आली. 12 पोलीस जखमी झाले. त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला’

दरम्यान जालना घटनेबाबत औरंगाबाद परिक्षेत्राचे आयजीपी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले की, “उपोषणाला बसलेल्या मनोज जरंगे यांची प्रकृती ढासळू लागली. अतिरिक्त एसपी आणि एसडीएम यांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सांगितले मात्र तेथे उपस्थित जमावाने दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत आमचे पोलिस कर्मचारी जखमी झाले. 21 महिला अधिकारी आणि 43 जवान जखमी झाले. एकूण 64 अधिकारी जखमी झाले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी आम्ही न्याय्य बळाचा वापर केला. 40 आंदोलकांना अटक करण्यात आली. बसेस जाळल्या गेल्या आणि आम्ही त्याची चौकशी करत आहोत. अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली आहे. आम्ही जागरुक आहोत आणि आम्ही आता सावध देखील आहोत”

जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार तर, पोलिसांवर गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीचार्ज करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जालना येथील घटनेत जखमी झालेल्या सर्व जखमी पोलिसांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment