रितेश-जेनिलियाचे प्रेमाचे वेड पुन्हा दिसणार, ‘वेड तुझे’ गाण्याचे नवे व्हर्जन लवकरच

रितेश- जेनिलिया ( Riteish Deshmukh, Genelia Deshmukh) ही जोडी प्रेक्षकांसाठी ऑफ स्क्रिन आणि ऑन स्क्रिन आवडीची आहे. ‘वेड’ या चित्रपटातून ही जोडी कित्येक वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहून पुन्हा एकदा प्रेक्षक आणि त्यांचे चाहते त्यांच्या प्रेमात पडले. मराठीत खूप दिवसांनी ब्लॉग बस्टर असा चित्रपट पाहता आला. या चित्रपटातील कथानकासोबतच यातील गाणी ही देखील तितकीच ट्रेडिंग आहेत. आता या ट्रेडिंग गाण्यामध्ये आणखी एका गाण्याची भर पडणार आहे. श्रावणी आणि सत्याच्या नव्या प्रवासातील  ‘वेड तुझे’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कसे? त्यासाठी वाचा 

पहिल्यांदाच घडणार असे काही

वेड तुझे गाण्यातील एक क्षण

चित्रपट तयार करताना त्यात अनेक सीन्स शूट केले जातात. काही सीन्स नक्कीच त्यातून वगळले जातात. त्यानंतर त्याचा एखादा मजेशीर व्हिडिओ बनवण्यात येतो. पण मूळ चित्रपटाला कधीच धक्का दिला जात नाही. पण पहिल्यांदाच असे काही तरी होणार आहे. चित्रपटाचा आनंद कित्येक हजार प्रेक्षकांनी घेतल्यानंतर आता या चित्रपटातून वगळलेलं गाणं ‘वेड तुझे’ हे गाणे आता नव्याने प्रेक्षकांसाठी या चित्रपटात पुन्हा दाखवण्यात येणार आहे. सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाची सुरुवात आपण या चित्रपटात पाहिली पण या प्रेमाला आलेला बहर आज आपल्याला नव्या गाण्यातून दिसणार आहे. इतकेच काय तर या चित्रपटातून वगळण्यात आलेले काही सीन्सही पुन्हा टाकण्यात येणार आहे. यापुढे म्हणजेच 20 जानेवारीपासून जे चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जातील त्यांना हा बदल अनुभवता येणार आहे. त्यामुळे या गाण्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट चित्रपटगृहातच पाहावा लागणार आहे. 

50 कोटीकडे घौडदोड

वेड हा फार मोठा बिग बजेट चित्रपट नसला तरी देखील यामधील सगळी पात्रही दमदार आहेत. अशोक मामा अर्थात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनयामुळे या चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. त्यांचा विनोदाचा करेक्ट टायमिंग या चित्रपटात या वयातही दिसून येतो. ‘बाप असावा तर असा’ अशी प्रतिक्रिया त्यांची भूमिका पाहिल्यानंतर येणार नाही असे अजिबात होणार नाही. सत्याचा मित्र म्हणून शुभंकर तावडे याने भूमिका साकारली आहे. ती भूमिका ही नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. एकूणच काय या चित्रपटातील सगळ्या प्रमुख भूमिका या नक्कीच सगळ्यांना लक्षात राहतील अशा आहेत. 

संगीताने केली जादू 

चित्रपटाचे संगीत हे त्याच्यासाठी USB असतो. या चित्रपटातील गाणी अजय- अतुल यांची आहेत. त्यामुळे चित्रपट येण्याआधीच ही गाणी सगळ्यांना आवडली होती. यातील वेड तुझा हे गाणं अजय- अतुल यांनी गायलं आहे. तर इतर गाणी ही विशाल दधलानी, श्रेया घोषाल यांच्या आवाजात आहेत.

आता या नव्या गाण्यामुळे आणि नव्या बदलामुळे चित्रपटाला किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Leave a Comment